आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका बरोबरीत; भारतीय संघाचे झाले मोठे नुकसान!

आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका बरोबरीत; भारतीय संघाचे झाले मोठे नुकसान!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa)च्या टी-20 मालिकेत विजय न मिळवल्यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa)च्या टी-20 मालिकेत विजय न मिळवल्यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. दोन्ही संघा दरम्यान 3 सामन्यांची टी-20 मालिका नुकतीच झाली. या मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे होता पण पावसामुळे तो रद्द झाला. मोहाली येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला तर तिसऱ्या आणि अखेरच्या बेंगळुरू येथे झालेल्या सामन्यात आफ्रिकेने विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडवली. आफ्रिकेने ही मालिका बरोबरीत सोडवल्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे.

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या टी-20 क्रमवारीत (ICC T20I Rankings) भारताचे स्थान घसरले आहे. ताज्या क्रमवारीनुसार भारतीय संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर होता तो आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मालिका बरोबरीत सोडवण्याचा फायदा आफ्रिकेच्या संघाला मिळाला आहे. आफ्रिका मालिकेआधी चौथ्या स्थानावर होता तो आता तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

क्रमवारीत पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंड, पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलिया, सहाव्यावर न्यूझीलंड, सातव्यावर अफगाणिस्तान तर श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा संघ अनुक्रमे 8व्या आणि 9व्या स्थानावर आहे.

खराब कामगिरीनंतर देखील रोहितला फायदा

टी-20 मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्माला फायदा झाला आहे. टी-20 मालिकेत फार चांगली कामगिरी न करता येथील त्याचे स्थान एकने वाढले आहे. रोहित शर्माने दुसऱ्या टी-20त 12 तर तिसऱ्या टी-20त 9 धावा केल्या होत्या. तरी देखील क्रमवारीत त्याला फायदा झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीचा फलंदाज शिखर धवन हे दोघेही टॉप 10च्या जवळ पोहोचले आहेत. कोहलीने दुसऱ्या सामन्यात नाबाद 72 धावा केल्या होत्या. तो क्रमवारीत 11व्या स्थानावर आहे. तर धवन 13व्या स्थानावर आहे.

पालकांनी घेतला बदला, वर्गात घुसून शिक्षकाला चोपले LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 09:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading