• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: मॅच दरम्यान नमाज पडताना मोहम्मद रिझवानचा VIDEO VIRAL, शोएब अख्तरची मोठी प्रतिक्रिया

India vs Pakistan: मॅच दरम्यान नमाज पडताना मोहम्मद रिझवानचा VIDEO VIRAL, शोएब अख्तरची मोठी प्रतिक्रिया

भारत- पाकिस्तान मॅच दरम्यान पाकिस्तानचा बॅटर मोहम्मद रिझवानचा (Mohammad Rizwan) एक वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारतीय इनिंगच्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे.

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर:  गेल्या 29 वर्षात कोणत्याही पाकिस्तानच्या कॅप्टनला जमलं नाही ते बाबर आझमनं (Babar Azam) करुन दाखवलं आहे. पाकिस्ताननं वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा (India vs Pakistan) पराभव केला आहे. या कामगिरीनंतर पाकिस्तानमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट फॅन्सनी रस्त्यावर उतरून वर्ल्ड कप जिंकल्याच्या थाटात सेलिब्रेशन केले. प्रत्येक पाकिस्तानी फॅन सध्या बाबर आझमची प्रशंसा करत आहे. भारत- पाकिस्तान मॅच दरम्यान पाकिस्तानचा बॅटर मोहम्मद रिझवानचा (Mohammad Rizwan) एक वेगळा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारतीय इनिंगच्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) हा व्हिडीओ शेअर केलाय. भारताच्या इनिंगमधील ड्रिंक्स ब्रेक्सच्या दरम्याम दोम्ही टीमचे खेळाडू वेगवेगळे उभे होते. त्यावेळी या सर्वांपासून दूर मोहम्मद रिझवान अल्लाहची प्रार्थना करत होता. रिझवानच्या याच प्रार्थनेमुळे पाकिस्तानला विजय मिळला अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरनं दिली आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून 'अल्लाह समोर झुकणारा डोकं कुणापुढे झुकणार नाही, याची काळजी अल्लाह करतो,' असं कॅप्शन अख्तरनं या व्हिडीओला दिलं आहे.
  मोहम्मद रिझवाननं रविवारी झालेल्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये रविवारी जोरदार खेळ केला. त्यानं 41 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. त्यानंतर मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये एक सिक्स आणि दोन फोर लगावत त्यानं टीमला विजय मिळून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वात जास्त 79 रन काढले. त्याने 55 बॉलचा सामना करत 6 फोर आणि 3 सिक्स लगावले. India vs Pakistan: पाकिस्तानच्या विजयानंतर बाबर आझमच्या वडीलांना अश्रू अनावर, VIDEO VIRAL त्यापूर्वी टीम इंडियानं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 151 रन केले. पाकिस्ताननं 152 रनचं लक्ष्य 17.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण करत एकतर्फी विजय मिळवला. या विजयानं पाकिस्ताननं त्यांच्या वर्ल्ड कप अभियानाची सुरूवात विजयानं केली आहे. 1992 पासून पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा पराभव झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: