मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: हार्दिक पांड्याला परत पाठवण्याचा झाला होता निर्णय, टीम इंडियातील दिग्गजानं वाचवलं

T20 World Cup: हार्दिक पांड्याला परत पाठवण्याचा झाला होता निर्णय, टीम इंडियातील दिग्गजानं वाचवलं

हार्दिकच्या कामगिरीवर (Hardik Pandya) टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य देखील खूश नव्हते. त्याला भारतामध्ये परत पाठवण्याची त्यांची इच्छा होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 ऑक्टोबर:  टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) सध्या खराब काळ सुरू आहे. खराब फिटनेसमुळे त्यानं गेल्या कित्येक मॅचमध्ये बॉलिंग केलेली नाही. तसंच त्याचा बॅटींगमधील फॉर्म देखील ढासळला आहे. त्यामुळे त्याच्या प्लेईंग 11 मधील जागेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. हार्दिकच्या कामगिरीवर टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य देखील खूश नव्हते. हार्दिकला भारतामध्ये परत पाठवण्याची त्यांची इच्छा होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार, 'आयपीएल स्पर्धेतील खराब फॉर्म आणि बॉलिंग देखील करत नसल्यानं निवड समितीनं त्याला भारतामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पण, टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) यामध्ये हस्तक्षेप करत हार्दिकला वाचवलं. हार्दिक जबरदस्त फिनिशर असल्याचा युक्तीवाद धोनीनं निवड समितीसमोर केला.'

पांड्याचं काय होणार?

हार्दिकनं पाकिस्तान विरुद्ध बॉलिंग केली नव्हती. तसंच त्याला बॅटींगमध्येही कमाल करता आली नाही. या मॅचनंतर गेल्या दोन दिवसांपासून तो दुबईतील नेट प्रॅक्टीसमध्ये बॉलिंगचा सराव करत आहे. न्यूझीलंड विरुद्ध रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये तो बॉलिंग करेल असं मानलं जात आहे. तसं झालं नाही तर पांड्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते.

IPL 2022: मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला वगळणार! 'या' 3 खेळाडूंना देणार पसंती

हार्दिक धोनीला मानतो भाऊ

हार्दिक पांड्या आणि धोनीचं नातं हे खास आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिकनं दिलेल्या मुलाखतीमध्ये या नात्याचा उलगडा केला होता. धोनी हा असा व्यक्ती आहे, जो मला सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीनं ओळखतो. मी कसा आहे, मला काय आवडत नाही, हे सर्व त्याला माहिती आहे. 2019 साली माझ्यावरील बंदी हटल्यानंतर मला न्यूझीलंडला पाठवण्यात आले. त्यावेळी सुरुवातीला मला हॉटेलमध्ये रूम नव्हती. त्यावेळी मला धोनीनं रूमची व्यवस्था केल्याचा फोन आला. तो नेहमीच माझ्या मदतीसाठी तयार असतो.

IND vs NZ: विराट कोहलीचा फॉर्म पाहून विल्यमसनची उडणार झोप! VIDEO

मी धोनीच्या खूप जवळचा आहे. मला तो शांत करु शकतो. माझ्याशी संबंधित मोठा वाद झाल्यानंतर मला त्याच्याच मदतीची गरज भासली. त्यानं करिअरमध्ये अनेकदा मला मदत केली आहे. तो मला भावासारखा आहे. मी त्याचा सन्मान करतो कारण त्यानं मला गरज होती, तेव्हा सर्वात जास्त मदत केली.' असं हार्दिकनं सांगितलं होतं.

First published:

Tags: Hardik pandya, MS Dhoni, T20 world cup