क्रिकेटचं साहित्य जाळून नोकरी शोधायची का? त्या खेळाडूंचा ICC ला प्रश्न

क्रिकेटचं साहित्य जाळून नोकरी शोधायची का? त्या खेळाडूंचा ICC ला प्रश्न

आयसीसीच्या एका निर्णयानं झिम्बाम्बेच्या क्रिकेटपटूंचे करिअर उद्ध्वस्त झालं आहे.

  • Share this:

लंडन, 19 जुलै : झिम्बाम्बे क्रिकेटला सरकारी हस्तक्षेपामुळे आयसीसीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. आयसीसीने क्रिकेट बोर्डाला निलंबित केलं असून याचा फटका संघातील खेळाडूंना बसला आहे. खेळाडूंनी म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द अशी संपायला नको होती.

झिम्बाम्बेचा क्रिकेटपटू सिकंदर रजाने आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय वेदनादायी असा आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड कप क्वालीफायरमध्ये पराभवानंतर जशी भावना झाली होती तशीच आताही झाली असल्याचं रजाने म्हटलं आहे.

सध्या खेळाडूंचं भविष्य अधांतरी झालं आहे. कोणालाही काय करावं हेच सुचत नसल्याचं रजाने सांगितलं. आयसीसीने निलंबन कायम ठेवलं असंत तरी चाललं असतं पण संघाला क्रिकेट खेळण्याची परवानगी द्यायला हवी होती असंही रजा म्हणाला.

झिम्बाम्बेचा कोणताही खेळाडू आता इतर कुठंल काम करण्याबद्दल विचार करू शकत नाही. रजा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो म्हणाला की, मला नाही माहिती मी आता कुठं आतंरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून खेळू शकेन. आता आम्ही क्रिकेटचं साहित्य जाळून नोकरी शोधायला हवी का?

आयसीसीनं झिम्बाम्बे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लंडन मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने याबाबतची माहिती गुरुवारी जाहीर केले आहे. आय़सीसीने सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेतला आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आला. याबाबत झिम्बाब्वे क्रिकेटला इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही सरकारी हस्तक्षेप कमी करण्यात झिम्बाब्वे क्रिकेट अपयशी ठरल्याने अखेर आयसीसीने निलंबनाची कारवाई केली.

झिम्बाब्वे सरकारने तिथल्या क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी आयसीसीने हा निर्णय घेतला त्यावेळी झिम्बाब्वेची आय़र्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होती. झिम्बाब्वेशिवाय क्रोएशिया क्रिकेट फेडरेशनवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

झिम्बाम्बे क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यानं देशाच्या क्रिकेटवर पडला आहे. यात 30 खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर अनेक प्रश्न उभा राहिले आहेत. झिम्बाम्बेच्या या 30 खेळाडूंची कारकिर्द पणाला लागली आहे. या निर्णयानं सर्व खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आल्याचं म्हटलं जात आहे.

निलंबनानंतर झिम्बाब्वे क्रिकेटला आयसीसी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणार नाही. तसेच झिम्बाब्वेच्या संघाला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. यामुळे झिम्बाब्वेला पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या क्वालिफायरमध्ये खेळण्याचा आशा मावळल्या आहेत.जानेवारी 2020 मध्ये झिम्बाब्वेची भारतासोबत टी20 मालिका होणार होती. मात्र, निलंबनामुळे द्विपक्षीय मालिकाही धोक्यात आली आहे.

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ओव्हर थ्रोचा नियम बदलणार!

धोनीला सचिन, सेहवाग आणि मी एकाचवेळी संघात नको होतो; गंभीरचा खळबळजनक खुलासा

VIDEO: धक्कादायक! पोषण आहारातील डाळीमध्ये आढळलं वटवाघूळ

First published: July 19, 2019, 3:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading