ICC ODI Rankings: दीर्घकाळापासून एकही सामना खेळला नाही, तरीही वनडे क्रिकेटमध्ये कोहली-रोहितचाच बोलबाला

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा वनडे क्रिकेटमध्ये दबदबा कायम आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा वनडे क्रिकेटमध्ये दबदबा कायम आहे.

  • Share this:
    मुंबई, 05 नोव्हेंबर: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा वनडे क्रिकेटमध्ये दबदबा कायम आहे. आयसीसीच्या लेटेस्ट वनडे क्रमवारीत (ICC ODI Rankings) विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम हा रोहित शर्माच्या रेटिंगच्या अगदी जवळ आहे. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत त्याने एका शतकासह 221 धावा केल्याने त्याला 8 अंकांचा फायदा झाला आहे. त्यामुळे तो क्रमवारीत रोहित शर्माच्या खूप जवळ पोहोचला. दीर्घकाळानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामध्ये विराट आणि रोहित काय कामगिरी बजावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आयसीसीच्या या रॅकिंगमध्ये बॉलर्सच्या यादीत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तर भारताचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेविरुद्ध शानदार प्रदर्शन केल्याने पाकिस्तानचा बॉलर शाहीन शाह आफ्रिदी याने मोठी उडी घेतली आहे. थेट 8 स्थानांनी वर जात तो 16 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने टॉप 20 खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. रावळपिंडीमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने 49 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. जगभरातील गोलंदाज आपली कामगिरी सुधारून या क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जे क्रमवारीत असतात ते आणखी वरचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात. (हे वाचा-टीममध्ये निवड होण्याकरता वडिलांकडे मागण्यात आली होती लाच, विराटचा गौप्यस्फोट) या ताज्या क्रमवारीत विराट कोहली 871 अंकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा 855 अंकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीतील टॉप 10 मधील शेवटच्या  तीन फलंदाजांना फायदा झाला आहे. या क्रमवारीत डेव्हिड वॉर्नर 759 अंकांसह आठव्या स्थानावर, 755 अंकांसह क्विंटन डिकॉक नवव्या स्थानावर तर 754 अंकांसह जॉनी बेयरस्‍टो दहाव्या क्रमांकावर आहे. सीन विलियम्‍सची मोठी उडी पाकिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत झिम्बाबेच्या सीन विलियम्स आणि ब्रेंडन टेलर यांना देखील मोठा फायदा झाला आहे. टेलरने या मालिकेत एका शतकासह 204 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला सहा स्थानांचा फायदा झाला असून तो 42 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर विलियम्सने देखील या मालिकेत एका शतकासह 197 धावा केल्यामुळे त्याला क्रमवारीत 12 स्थानांचा फायदा झाला आहे. यानंतर तो 46 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतदेखील त्याने पहिल्या दहा खेळाडूंमध्ये प्रवेश केला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: