Home /News /sport /

ODI Bowling Ranking : बांगलादेशच्या 'या' बॉलरने बुमराहाला टाकले मागे

ODI Bowling Ranking : बांगलादेशच्या 'या' बॉलरने बुमराहाला टाकले मागे

आयसीसीने (ICC) या आठवड्याचे क्रिकेट रँकिंग (ICC ODI Bowling Ranking) जाहीर केले आहे. या रँकिंगमध्ये बांगलादेशच्या बॉलर्सचा फायदा झाला आहे.

    दुबई, 26 मे : आयसीसीने या आठवड्याचे क्रिकेट रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगमध्ये बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसन (Mehidy Hasan) याचा मोठा फायदा झाला आहे. त्याने आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये (ICC ODI Bowling Ranking) दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आजवरच्या इतिहासात  टॉप 2 मध्ये पोहचणारा महेदी हसन हा तिसरा बांगलादेशी बॉलर आहे. त्याने श्रीलंकेच्या विरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या वन-डे मध्ये चांगली कमगिरी केली. त्याचा फायदा हसनला झाला आहे. बॉलर्सच्या टॉप 10 रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा एकमेव भारतीय बॉलर आहे. हसनने या आठवड्यात बुमराहला मागे टाकले आहे. मेहदी हसनच्यापूर्वी 2009 साली बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने 2009 साली पहिल्या क्रमांकावर धडक मारली होती. त्यानंतर अब्दुल रज्जाक (Abdul Rajjak) हा 2010 साली दुसऱ्या क्रमांकावर पोहचला होता. त्यानंतर 11 वर्षांनी एखाद्या बांगलादेशी बॉलरने टॉप 2 मध्ये जागा मिळवली आहे. मेहदी हसनं या आवड्यात तीन नंबरचा फायदा झाला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये चार तर दुसऱ्या वन-डेमध्ये तीन विकेट्स  घेतल्या होत्या. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर कायम असून त्याच्यात आणि हसनमध्ये आता फक्त 12 पॉईंट्सचे अंतर आहे. अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान तिसऱ्या तर न्यूझीलंडचा मॅट हेन्री चौथ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रेहमान याला 8 क्रमांकाचा फायदा झाला आहे. त्याने टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. मुस्तफिजुरने श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही वन-डेमध्ये प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या 9 व्या क्रमांकावर आहे. फाटक्या बूटाचा फोटो शेअर करणे महागात, झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू संकटात बुमराह एकमेव भारतीय टीम इंडियाचा जसप्रित बुमराह हा एकमेव बॉलर सध्या टॉप टेन रँकिंगमध्ये आहे. तो चौथ्यावरुन पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा सहाव्या, इंग्लंडचा ख्रिस वोक्स सातव्या तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुज आठव्या क्रमांकावर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, Cricket news, Icc, Jasprit bumrah

    पुढील बातम्या