मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC ची 2 दिवसांची बैठक आजपासून सुरू, भारत -पाकिस्तान क्रिकेटवर होणार मोठा निर्णय

ICC ची 2 दिवसांची बैठक आजपासून सुरू, भारत -पाकिस्तान क्रिकेटवर होणार मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसी (ICC) या क्रिकेटमधील सर्वोच्च संस्थेची दोन दिवसांची बैठक आजपासून (रविवार) सुरूवात होत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसी (ICC) या क्रिकेटमधील सर्वोच्च संस्थेची दोन दिवसांची बैठक आजपासून (रविवार) सुरूवात होत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसी (ICC) या क्रिकेटमधील सर्वोच्च संस्थेची दोन दिवसांची बैठक आजपासून (रविवार) सुरूवात होत आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 10 एप्रिल : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसी (ICC) या क्रिकेटमधील सर्वोच्च संस्थेची दोन दिवसांची बैठक आजपासून (रविवार) सुरूवात होत आहे. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (PCB) रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी सादर केलेल्या महत्त्वकांक्षी प्रस्तावावर चर्चा होणार आहे. राजा यांनी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार देशांच्या वार्षिक टी20 क्रिकेटचा प्रस्ताव तयार केला आहे. ही सीरिज झाली तर आयसीसीला यामधून 75 कोटी डॉलर (जवळपास 57 अब्ज रूपये) महसूल मिळणार आहे. त्याचा मोठा भाग या चार देशांना दिला जाऊ शकतो. सध्या भारतीय टीम पाकिस्तान  विरूद्ध फक्त आशिया कप आणि वर्ल्ड कप या स्पर्धेमध्येच खेळते. दोन्ही देशांमधील अन्य सर्व सीरिज बंद आहेत. त्यामुळे बीसीसीआय या प्रस्तावावर कसा प्रतिसाद देणार ते पाहावं लागले. त्याचबरोबर आयसीसीनंही त्यांच्या सदस्यांना 3 किंवा जास्त देशांचा सहभाग असलेली स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी दिलेली नाही.या स्पर्धांमुळे टी20 वर्ल्ड कप किंवा वन-डे वर्ल्ड कप या आयसीसीच्या स्पर्धांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या 'त्या' अजब निर्णायाचं रोहित शर्मानं सांगितलं कारण नव्या अध्यक्षांची चर्चा आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. ग्रेग बार्कले त्यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी इच्छूक नसल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. आयसीसीने मात्र बार्कले यांच्या पद सोडण्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. बीसीसीआयनं अध्यक्षपदाच्या विषयावर अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. पुढच्या वर्षी वन-डे वर्ल्ड कप भारतामध्ये होणार आहे. त्या काळात आयसीसीच्या अध्यक्षाची भूमिका निर्णायक ठरू शकते. याआधी भारतात 2011 साली वर्ल्ड कप झाला होता, तेव्हा शरद पवार आयसीसीचे प्रमुख होते. सौरव गांगुली आयसीसी अध्यक्ष होण्यासाठी इच्छूक आहेत का नाहीत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी आपलं वय लहान आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई करणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं.
First published:

Tags: BCCI, Cricket news, Icc, Pakistan Cricket Board

पुढील बातम्या