मास्टर ब्लास्टरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICCनं 'हा' सन्मान देऊन केला गौरव

मास्टर ब्लास्टरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICCनं 'हा' सन्मान देऊन केला गौरव

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये केला.

  • Share this:

लंडन, 19 जुलै : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं सन्मान केला आहे. सचिनचा समावेश आयसीसीनं हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाची माजी वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही समावेश हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला. गुरुवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. याआधी भारताच्या बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनिल गावस्कर, अनिल कुंबळे यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता.

हॉल ऑफ फेमची घोषणा करताना आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी म्हणाले की, सचिन, एलन आणि कॅथरीन यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. आमच्यासाठी ही गोष्ट सन्मानाची आहे. आयसीसीकडून तीनही खेळाडूंना शुभेच्छा.

आयसीसी हॉल ऑफ फेमच्या माध्यमातून क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंच्या योगदानाची माहिती देऊन त्यांचा सन्मान करते. हॉल ऑफ फेमची सुरुवात आयसीसीने फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोशिएशनच्या सहकार्यानं केली होती. सुरुवातीला यामध्ये 55 खेळाडू होते.

आयसीसीच्या या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी नवीन खेळाडूंचा समावेश केला जातो. हॉल ऑफ फेममध्ये डब्ल्यू जी ग्रेस, ग्राहम गूच, बेरी रिचर्ड्स या दिग्गजांचा समावेश आहे.

पुरामध्ये वाहून गेलं घर, तरी देशासाठी शेतकरी कन्येनं जिंकलं चौथं गोल्ड मेडल!

SPECIAL REPORT : 'टिक टॉक'ची बोलती बंद होणार, सरकार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 07:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading