World Cup: रवींद्र जडेजाची सटकली, भारताच्याच माजी क्रिकेटपटूला सुनावले!

World Cup: रवींद्र जडेजाची सटकली, भारताच्याच माजी क्रिकेटपटूला सुनावले!

संजय मांजरेकरांच्या वक्तव्यावर जडेजाची सटकली आणि त्याने ट्विटकरून सडेतोड उत्तर दिले.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जुलै: ICC cricket world cupमध्ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. स्पर्धेत भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत भारताला फक्त एकच पराभव स्विकारावा लागला. पण असे असेल तरी भारतीय संघाकडून अनेक चूका झाल्या आहेत. या चूकांवर संघावर आणि वैयक्तीक खेळाडूंवर माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. अशीच एक टीका आता चर्चात आली आहे. भारतीय संघाने खेळलेल्या आतापर्यंतच्या 8 सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याला एकदाही संधी मिळाली नाही. जडेजा अनेकदा मैदानावर दिसलेला पण पहिल्या 11मध्ये स्थान मिळवू शकला नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात समालोचन करताना जडेजाला संघात स्थान देण्याबद्दल मत मांडले गेले. तेव्हा संजय मांजरेकर यांनी मला जडेजा सारखे खेळाडू आवडत नाहीत, जे थोडी फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. मांजरेकरांच्या या वक्तव्यावर जडेजाची सटकली आणि त्याने ट्विटकरून सडेतोड उत्तर दिले.

संजय मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना जडेजाने ट्विटवर लिहले आहे की, "मी तुमच्या पेक्षा दुप्पट सामने खेळले आहेत आणि अजून देखील खेळत आहे. दुसऱ्या व्यक्तीने जे कमवले आहे त्याचा आदर करायला शिका. मी तुमची फालतू बडबड खुप ऐकूण घेतली आहे."

वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून संजय मांजरेकर स्वत:च्या वक्तव्यामुळे अडचणीत येत आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांवर चाहत्यांनी टीका केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चाहत्यांनी मांजरेकरांना समालोचन करण्यापासून हटवण्याची मागणी केली होती. केवळ जडेजाच नाही तर महेंद्र सिंग धोनीवर देखील केलेल्या वक्तव्यावर अनेक युझर्स नाराज आहेत. धोनीच्या विरुद्ध बोलल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

बांगलादेशविरुद्ध धोनी बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावर श्रीवत्‍स गोस्‍वामी यांनी टीका केली आहे. धोनी बाद झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद संजय मांजरेकरांना झालेला दिसतोय असे गोस्वामीने म्हटले होते. काहीच दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने मांजरेकर चर्चेत राहण्यासाठी नकारात्मक बोलतात अशी टीका केली होती.

चाहत्याने ICCला लिहले पत्र

काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने संजय मांजरेकरांच्या विरुद्ध थेट आयसीसीकडे तक्रार केली होती. या चाहत्याने मांजरेकरांवर पक्षपाताचा आरोप केला होता. ए.डी.कुमार या चाहत्याने पत्र लिहून तक्रार केली होती. मांजरेकर समालोचन करताना पक्षपात करतात तसेच ते त्यांची वक्तव्ये बेजबाबदार असतात. अनेक वेळा ते स्वत:च्या गोष्टी सांगतात, असे या पत्रात म्हटले होते.

तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 4, 2019, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading