लंडन, 13 जुलै: ICC Cricket World Cupची सुरूवात झाली होती तेव्हा सर्वांना वाटलं होतं की न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये नक्की प्रवेश करेल. पण त्यावेळी असा विचार देखील कोणी केला नव्हता की व्हिल्यमसनच्या नेतृत्वाखालील हा संघ अंतिम फेरीत धडक मारेल. सेमीफायनल लढतीत न्यूझीलंडने भारतासारख्या मजबूत संघाचा पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. आता 14 तारखेला यजमान इंग्लंडविरुद्ध ते जेतेपदासाठी लढतील. अनपेक्षितपणे फायनलमध्ये पोहोचलेल्या हा संघ कोणत्याही एका खेळाडूवर नाही अवलंबून नाही राहत. संघातील प्रत्येक खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात छोटे-छोटे योगदान देतो. त्याचा परिणाम विरुद्ध संघाचा पराभव होतो.
न्यूझीलंडच्या संघातील खेळाडू विराट, धोनी, वॉर्नर सारखे प्रसिद्ध नाहीत. स्वत: कर्णधार व्हिल्यमसन फलंदाजी आणि नेतृत्वाबाबत विराट कोहलीपेक्षा अनेक अर्थाने पुढे आहे. तरी देखील तो लो प्रोफाईल आहे. या संघातील अनेक खेळाडू केवळ क्रिकेट खेळत नाहीत तर एक सामान्य व्यक्तीसारखे आयुष्य जगतात. ज्या समस्या एका सामान्य व्यक्तीला येतात तशाच अडचणी या क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर येतात. या अडचणी इतक्या गंभीर असतात की निवृत्तीनंतर घर चालवण्यासाठी पैसे कमी पडतात. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात क्रिकेटपटूंना प्रचंड पैसे मिळतात. पण न्यूझीलंडमधील क्रिकेटपटूंची अवस्था वेगळी आहे. संघातील खेळाडूंना विराट, मॉर्गन आणि फिंच या खेळाडूसारखे मानधन मिळत नाही.
क्रिकेट सोडल्यानंतर होतात हाल...
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस केन्स तुम्हाला आठवत असेल किंवा मॅथ्यू सिंक्लेअर या दोघांनी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. पण निवृत्त झाल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मॅच फिक्सिंगचा आरोप झालेल्या केन्सला न्यायालयीन लढाई लढावी लागली होती. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती देखील बिघडली. केन्स मॅच फिक्सिंगच्या आरोपातून सुटला खरा पण वैयक्तीक आयुष्यात त्याला मोठा संघर्ष करावा लागत आहे. 44 वर्षीय केन्सने घर चालवण्यासाठी ऑकलँडमध्ये बस धुण्याचे आणि ट्रक चालवण्याचे काम केल्याचे वृत्त मीडियाने दिले आहे.
बेरोजगार आहे हा क्रिकेटपटू
कसोटी पदार्पणातच द्विशतक करणाऱ्या मॅथ्यू सिंक्लेअरचे निवृत्तीनंतरचे आयुष्य मात्र खडतर झाले आहे. 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा मॅथ्यू अनेक महिने बेरोजगार होता. आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे त्याच्याकडे कुटुंबाचा दैनंदिन खर्च चालवण्यासाठी पैसे नव्हते. शैक्षणपूर्ण केले नसल्यामुळे मॅथ्यूला नोकरी देखील मिळाली नाही. अखेर नेपिअर येथे एका रियल इस्टेटमध्ये सेल्स पर्सन म्हणून त्याला नोकरी मिळाली.
राम शिंदेंनी केली शेतकऱ्यांसोबत खरीपाची पेरणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या