World Cup: बांगलादेशविरुद्ध भारताची नजर सेमीफायनलवर; विराटसेनेला 'हा' आहे धोका! ICC cricket world cup | india vs bangladesh |india | bangladesh

World Cup: बांगलादेशविरुद्ध भारताची नजर सेमीफायनलवर; विराटसेनेला 'हा' आहे धोका! ICC cricket world cup | india vs bangladesh |india | bangladesh

ICC cricket world cupमध्ये आज (2 जुलै) भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 02 जुलै: ICC cricket world cupमध्ये आज (2 जुलै) भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. एजबॅस्टन मैदाावर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारताल सेमीफायनलमध्ये जागा निश्चित करण्याची संधी आहे. भारतीय संघाचे 7 सामन्यात 11 गुण झाले आहेत. गुणतक्त्यात टीम इंडिया दुसऱया स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा संघ 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. पण बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात भारताला सावध राहणे गरजेचे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अनके कमकूवत बाजू समोर आल्या आहेत. विशेषत: महेंद्र सिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. त्यापैकी एक बांगलादेशने जिंकला आहे तर दोनमध्ये सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 2007मध्ये या दोन्ही संघात वर्ल्ड कपमधील पहिला सामना झाला होता. त्यात बांगालादेशने 5 गडी राखून विजय मिळवला होता. 2011च्या स्पर्धेत भारताने 87 धावांनी तर 2015च्या स्पर्धेत टीम इंडियाने 109 धावांनी बाजी मारली होती. तर या दोन्ही संघात आतापर्यंत 35 वनडे झाले आहेत. त्यापैकी 29 सामने भारताने तर 5 सामने बांगलादेशने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता.

World Cup Point Table : विंडीजच्या पराभवाने तीन संघांची नजर भारतावर!

शाकिब मोठा धोका

भारतीय संघासाठी या सामन्यात बांगलादेशचा अष्ठपैलू खेळाडू शाकिब अल हसन हा धोकादायक ठरू शकतो. शाकिबने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या 6 सामन्यात त्याने 2 शतक आणि 3 अर्धशतकासह 476 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीकरत 10 विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात शाकिब एकट्याच्या बळावर सामना जिंकू देऊ शकतो.

याच मैदानावर झाल्या होत्या 408 धावा

एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध 9 बाद 408 धावा केल्या होत्या. भारत विरुद्ध बांगलादेश सामना याच पिचवर खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना याच मैदानावर झाला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळपट्टी संथ होती. सामना जस जसा पुढे जाईल तस तसे धावा करता येणार नाहीत. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो.

एजबॅस्टन मैदानावरील सीमा रेषा 59 मीटरवर आहे. यावर कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली होती. सीमा रेषाजवळ असल्यामुळे त्याचा फायदा इंग्लंडने घेतला होता. पण भारताने या मैदानावर एक सामना खेळला आहे. त्याचा फायदा बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो.

काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज

वर्ल्ड कपमध्ये सर्व संघांनी धास्ती घेतली आहे ती पावसाची... अनेक संघांना पावसाचा फटका बसला आहे. स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे काही संघांचे सेमीफायनलला जाण्याचे स्वप्न तुटले आहे तर काहींना त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. भारत-बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी ढगाळ वातावरण असेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. बर्मिंगहॅम तापमान 20 डिग्री सेल्सिअस असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

VIDEO: 'सरकारनं करून दाखवण्यापेक्षा तुडुंब मुंबई भरून दाखवली'

First published: July 2, 2019, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading