मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार 20 टीम, ICC ची नवी योजना

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार 20 टीम, ICC ची नवी योजना

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) जागतिक स्तरावर क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. जागतिक क्रीडा स्पर्धेचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिकमध्ये (Olympic) क्रिकेटचा सहभाग व्हावा यासाठी आयसीसीचे हे सर्व प्रयत्न सुरु आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

दुबई, 14 मे: आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) जागतिक स्तरावर क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून टी 20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup) 20 टीम खेळण्याची परवानगी देण्याचा आयसीसी विचार करत आहे. 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये या योजनेचे अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या टीमची विभागणी 4 गटांमध्ये केली जाईल. प्रत्येक गटामध्ये 5 टीम असतील. या वर्षी भारतामध्ये टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) होणार आहे. यामध्ये 16 टीम सहभागी होणार आहेत.

इएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार 'क्रिकेटच्या विस्तारासाठी टी20 चा वापर करण्याचा आयसीसीचा विचार आहे. या विषयावर यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे. महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत अधिक टीम खेळवण्यास आयसीसीनं यापूर्वीच परवानगी दिली आहे.' क्रिकेटला जास्त लोकप्रिय करण्यासाठी वन-डे वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या देशांची संख्या वाढवण्याचाही आयसीसीचा विचार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास 2023 च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये (ICC Cricket World Cup 2023) 10 च्या ऐवजी 14 टीम सहभागी होतील. इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 10 टीम सहभागी झाल्या होत्या.

ऑलिम्पिमध्ये क्रिकेटचा सहभाग

जागतिक क्रीडा स्पर्धेचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिकमध्ये (Olympic) क्रिकेटचा सहभाग व्हावा यासाठी आयसीसीचे हे सर्व प्रयत्न सुरु आहेत. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये 2032 साली ऑलिम्पिक होण्याची शक्यता आहे. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होऊ शकतो.

IPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत? राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यास किती टीम खेळणार आणि त्याचं स्वरुप काय असेल हे आणखी निश्चित झालेलं नाही. मात्र T10 प्रकारावर अनेक देशांचा जोर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त टीम सहभागी होतील आणि कमी कालावधीमध्ये क्रिकेट स्पर्धा पूर्ण करता येईल, असा या देशांचा दावा आहे.

First published:

Tags: Cricket, Icc