8 दिवसांमध्ये 3 जणांवर ICC ची कारवाई, आता 'या' देशातील खेळाडूवर बंदी

8 दिवसांमध्ये 3 जणांवर ICC ची कारवाई, आता 'या' देशातील खेळाडूवर बंदी

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) बुधवारी आणखी एका खेळाडूवर बंदीची कारवाई केली आहे. आयसीसीनं गेल्या आठ दिवसांमध्ये केलेली ही तिसरी कारवाई आहे.

  • Share this:

दुबई, 22 एप्रिल: इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) बुधवारी आणखी एका खेळाडूवर बंदीची कारवाई केली आहे. आयसीसीनं गेल्या आठ दिवसांमध्ये केलेली ही तिसरी कारवाई आहे. ताजं प्रकरण युएईचा खेळाडू कादिर खानचं (Qadir Khan) आहे. त्याच्यावर भ्रष्टाचारविरोधी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणात 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

कादिर खानवर 2019 साली भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे कादिरवरील निलंबनाचा कालावधी 16 ऑक्टोबर 2019 पासून लागू होईल असं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.  झिम्बाब्वे विरुद्ध युएई यांच्यात एप्रिल 2019 साली झालेल्या मालिकेशी संबंधित प्रकरण आहे. कादिरनं या मालिकेच्या संदर्भातील सट्टेबाजांना उपयोगी माहिती जाणीवपूर्वक सार्वजनिक केली होती.

त्याचबरोबर ऑगस्ट 2019 साली नेदरलँड्स आणि युएईमध्ये झालेल्या मालिकेत भ्रष्टाचार करण्यासाठी संपर्क साधण्यात आल्यानंतर कादिरनं ती माहिती आयसीसीला दिली नव्हती. "कादिर खान हा एक अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. त्यानं भ्रष्टाचार विरोधी प्रशिक्षण घेतलं आहे. त्याच्या सारख्या खेळाडूनं भ्रष्टाचार करणं टाळायला हवं होतं. तसंच याबाबत आयसीसीला तातडीनं सूचना द्यायला हवी होती, असं मत आयसीसीचे अधिकारी एलेक्स मार्शल यांनी व्यक्त केलं आहे.

8 दिवसांमधील तिसरं प्रकरण

आयसीसीनं भ्रष्टाचार विरोधी प्रकरणात केलेली ही आठ दिवसांमधील तिसरी कारवाई आहे. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि फास्ट बॉलर हीथ स्ट्रीक (Heath Streak) याच्यावर मागच्या आठवड्यात भ्रष्टाचारप्रकरणी 8 वर्षांची बंदी घालण्यात आली, त्यानंतर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहरा लोकुहितगे (Dilhara Lokuhettige) याच्यावरही आयसीसीने 8 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

2,6,6,6,4,6 पॅट कमिन्सनं एकाच ओव्हरमध्ये काढले 30 रन! नव्या विक्रमाची नोंद

आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचार विरोधी लवादाला लोकुहितगे दोषी आढळला. 3 एप्रिल 2019 पासून लोकुहितगेचं निलंबन सुरू झालं आहे, कारण त्यावेळीच त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई करण्यात आली होती.

Published by: News18 Desk
First published: April 22, 2021, 11:21 AM IST

ताज्या बातम्या