मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC 2023 : ICC कडून संपूर्ण कार्यक्रम जाहीर, पाहा टीम इंडियाचे वेळापत्रक

WTC 2023 : ICC कडून संपूर्ण कार्यक्रम जाहीर, पाहा टीम इंडियाचे वेळापत्रक

आयसीसीनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप 2023 (World Test Championship 2023) स्पर्धचे संपूर्ण वेळापत्रक आणि सुधारित पॉईंट सिस्टम जाहीर केली आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 14 जुलै: आयसीसीनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप 2023 (World Test Championship 2023) स्पर्धचे संपूर्ण वेळापत्रक आणि सुधारित पॉईंट सिस्टम जाहीर केली आहे. यावेळी एक टेस्ट मॅच जिंकल्यानंतर विजयी टीमला 12 पॉईंट्स मिळतील. तर टाय झाल्यानंर दोन्ही टीमला 6 आणि टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर दोन्ही टीमला प्रत्येकी 4 पॉईंट्स देण्यात येतील. त्याचबरोबर टीमची रँक निश्चित करण्यासाठी पर्सेंटेज पॉईंट्स पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

या पद्धतीनुसार मॅच जिंकणाऱ्याा टीमला 100 टक्के पर्सेंटेज पॉईंट्स देण्यात येतील. मॅच टाय झाल्यानंतर दोन्ही टीमला प्रत्येकी 50 तर ड्रॉ झाल्यानंतर 33.33 पर्सेंटेज पॉईंट्स देण्यात येणार आहेत.

सीरिजच्या आधारावर पॉईंट्स

आयसीसीनं यंदा सीरिजच्या आधारावर पॉईंट्स देण्याचा निर्णय घेतला आहे. एका सीरजमध्ये 2 टेस्ट असतील तर 24, 3 टेस्ट असल्यास 36, 4 टेस्टसाठी 48 आणि 5 टेस्टसाठी 60 पॉईंट्स देण्यात येतील.

टीम इंडियाचे वेळापत्रक

आयसीसीनं संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या सिझनप्रमाणेच यंदाही नऊ टीम सहा सीरिज खेळणार आहेत. यामध्ये प्रत्येक टीम 3 सीरिज घरच्या तर 3 सीरिज विदेशातील मैदानावर खेळेल. (three home and three away) भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात 4 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टपासून हा सिझन सुरु होईल.  31 मार्च 2023 पर्यंत ही स्पर्धा चालेल.

डेव्हिड वॉर्नरनं अक्षय कुमारच्या स्टाईलनं केली 'हेराफेरी' राशिद खानला म्हणाला..

भाारतीय टीम यंदा मायदेशात श्रीलंका, न्यूझीलंड आणि आणि ऑस्ट्रेलिया या टीमविरुद्ध खेळणार आहे. तर इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा दौरा करेल.

First published:

Tags: Cricket news, Icc, Team india