Home /News /sport /

चेतेश्वर पुजाराच्या चिमुकलीनं शोधला बाबांच्या जखमांवर उपाय, त्याला देणार ‘गोड औषध’!

चेतेश्वर पुजाराच्या चिमुकलीनं शोधला बाबांच्या जखमांवर उपाय, त्याला देणार ‘गोड औषध’!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या टेस्टमधील दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) हाताला, छातीवर, हेल्मेटसह अनेक ठिकाणी बॉल लागला. पुजाराच्या दोन वर्षांच्या चिमुकलीनं या जखमांवर गोड औषध शोधलं आहे.

    मुंबई, 22 जानेवारी: चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) भारतीय टेस्ट टीमचा स्तंभ आहे.  बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) तो ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्ससमोर एका भितींसारखा उभा राहिला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि मालिकेतील शेवटच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी त्याच्या शरीरावर लक्ष्य केलं होतं. जवळपास एक डझन बॉल त्याच्या शरीराला लागले. ऑस्ट्रेलियानं इतका तिखट मारा केल्यानंतरही पुजाराचा निश्चय ढळला नाही. त्यानं चौथ्या डावात 200 पेक्षा जास्त बॉल खेळले. पुजाराच्या चिमुकलीनं शोधला उपाय! भारतीय टीमनं सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2-1 नं जिंकली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडू घरी परतले आहेत. पुजाराही त्याच्या घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर एका मुलाखतीमध्ये पुजारानं  बाब-लेकीतील एक गोड गुपित सांगितलं. पुजाराची दोन वर्षांची चिमुकली आदिती पुजारानं वडिलांच्या जखमांवर गोड औषध शोधलं आहे. 'तो (चेतेश्वर पुजारा) जेंव्हा घरी येईल तेंव्हा त्याच्या शरीरावर जिथं-जिथं बॉल लागला आहे, तिथं मी पापा घेईन' असं आदितीनं पुजाराला सांगितलं होतं. त्यामुळे आपले बाबा लवकर बरे होतील अशी तिची समजूत आहे. (हे वाचा-Sayed Mushtaq Ali Trophy: स्पर्धा सोडून जाणारा ‘हा’ खेळाडू निलंबित!) पुजाराला कुठे लागला होता बॉल? ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या टेस्टमधील दुसऱ्या डावात पुजाराच्या हाताला, छातीवर, हेल्मेटसह अनेक ठिकाणी बॉल लागला. या वेदनांचा त्रास त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तरीही त्यानं 211 बॉलमध्ये 56 रन काढले. त्याचबरोबर पुजारानं दुसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल (Shubhman Gill) सोबत 114 रनची भागिदारी देखील केली. ‘पेन किलर घेत नाही’ ‘तुला त्रास होत नाही का?’ असा प्रश्न पुजाराला यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी “मी कधीही ‘पेन किलर’ घेत नाही. त्यामधूनच मला त्रास सहन करण्याची प्रेरणा मिळते असं पुजारानं सांगितलं. (हे वाचा-IND vs ENG: भारत दौऱ्यासाठी इंग्लंड टीम जाहीर, दोन बड्या खेळाडूंचं कमबॅक!) या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजारानं 33.87 च्या सरासरीनं 271 रन काढले. त्यानं सिडनी टेस्टच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकावलं. त्यामुळे भारताला ती टेस्ट ड्रॉ करता आली. यापूर्वी 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियातील मालिकेत पुजारानं 74.42 च्या सरासरीनं 521 रन काढले होते. पुजारा ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सर्वात जास्त इनिंगमध्ये 200 पेक्षा जास्त बॉल खेळणारा भारतीय बॅट्समन आहे. त्यानं नऊ वेळा हा पराक्रम केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या