मँचेस्टर, 11 जुलै: ICC Cricket World Cupमध्ये भारताने शानदार कामगिरी केली. पण एका सामन्यातील खराब कामगिरीने भारतीय संघाचे वर्ल्ड जिंकण्याचे स्वप्न भंगले. मँचेस्टरच्या मैदानावर झालेल्या सेमीफायनलमधील सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 239 धावा केल्या होत्या. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यानंतर जडेजा आणि धोनी यांनी भारताला विजयाजवळ पोहोचवले पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. या पराभवानंतर भारत स्पर्धेतून बाहेर झाला तर न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला. भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांची मते मांडली आहेत. यात भारताच्या पराभवावर वादग्रस्त वक्तव्य एका माजी क्रिकेटपटूने केले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या भारताच्या पराभवानंतर त्यांच्याच एका माजी क्रिकेटपटूने वादग्रस्त विधान केले आहे. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू जेरेमी कोनी यांनी न्यूझीलंडच्या विजयानंतर म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला भारताच्या पराभवामुळे आणि न्यूझीलंडच्या विजयामुळे आनंद झाला नसेल. ते म्हणतात, मला वाटत नाही न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केलेला आयसीसीला आवडला असेल. कोनी यांच्या या विधानानंतर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
World Cup : पंचांच्या चुकीचा भारताला फटका अन् धोनी झाला धावबाद?
वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत विजयाचा मुख्य दावेदार होता. भारताची स्पर्धेतील कामगिरी देखील शानदार होती. असेल असताना पाऊस आणि हवामान यांची साथ न्यूझीलंडला मिळाली. मँचेस्टरमधील सामन्यात भारताचा विजय अपेक्षित असताना न्यूझीलंडने बाजी मारली. भारतीय संघ जगातील सर्वात लोकप्रिय संघ आहे. वर्ल्ड कपमधील भारतीय संघाच्या सामन्याला मैदान पूर्ण भरलेले होते. टिव्हीवर देखील अन्य सामन्यांपेक्षा भारतीय संघाच्या सामन्याला अधिक टीआरपी मिळतो. लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्याची अधिक तिकीटे भारतीय चाहत्यांनी घेतली आहेत. पण आता टीम इंडिया स्पर्धेबाहेर पडल्यामुळे अंतिम सामन्यावर त्याचा फरक नक्कीच पडेल, या कारणामुळे कोनी यांनी असे वक्तव्य केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोण आहेत जेरेमी कोनी
कोनी हे न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आहेत. न्यूझीलंडकडून त्यांनी 52 कसोटी आणि 88 वनडे सामने खेळले आहेत. तर 15 कसोटी आणि 25 वनडे सामन्यात त्यांनी संघाचे नेतृत्व देखील केले आहे. कसोटीत कोनी यांनी 2 हजार 668 तर वनडेत 1 हजार 874 धावा केल्या आहेत.
VIDEO: कट्टर शत्रू असलेल्या साप-मुंगसाच्या लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद