• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL स्पर्धेच्या दरम्यान 8-9 दिवस झोपला नाही अश्विन, क्रिकेटपटूनं सांगितलं 'ते' कारण

IPL स्पर्धेच्या दरम्यान 8-9 दिवस झोपला नाही अश्विन, क्रिकेटपटूनं सांगितलं 'ते' कारण

आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा (DC) प्रमुख बॉलर आर. अश्विनने (R. Ashwin) स्पर्धेतून माघार घेतली होती. अश्विनने 'ही माघार का घेतली?' याचे कारण सांगितले आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 मे: कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 (IPL 2021) ही स्पर्धा 4 मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. आता उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा (DC) प्रमुख बॉलर आर. अश्विनने (R. Ashwin) स्पर्धेतून माघार घेतली होती. अश्विनच्या घरातील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्याने हा निर्णय घेतला होता.अश्विनने पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, "माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. माझी काही चुलत भावंडांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मी किमान 8-9 दिवस झोपू शकलो नाही. झोप न मिळाल्याने मी खूप तणावात होतो. मी न झोपताच मॅचमध्ये खेळलो. त्यानंतर आयपीएल स्पर्धेतून माघार घेत घरी जाण्याचा निर्णय घेतला." अश्विनला 2021 च्या आयपीएलमध्ये पाच मॅचमध्ये फक्त एक विकेट घेण्यात यश आले होते. अश्विनने पुढे सांगितले की, "आयपीएलमधून माघार घेत घरी परतल्यानंतर आपण पुन्हा क्रिकेट खेळू शकू का? हा विचार माझ्या मनात आला होता. मात्र त्यावेळी मी तेच केलं ज्याची सर्वात जास्त गरज होती. माझ्या घरातील व्यक्ती बऱ्या झाल्यानंतर पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याचं मी ठरवलं होतं. पण तोपर्यंत ही स्पर्धाच स्थगित झाली." IPL 2021: इंग्लंड क्रिकेट बोर्ड निर्णयावर ठाम, BCCI च्या अडचणीत भर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणारा अश्विन सध्या इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहे. तो सध्या टीम इंडियातील अन्य खेळाडूंसोबत मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे. भारतीय टीम 18 जून पासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टेस्टची मालिका होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: