...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री

मला वाटलेलं की आपण मित्र आहोत. पण मी आता नक्कीच सांगू इच्छितो की माझं कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे

  • Share this:

एकीकडे युवराज सिंग पुन्हा एकदा भारतीय संघात येण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातही नातेसंबंधांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सध्या युवराज त्याचा लहानपणीचा मित्र अंगद बेदीवर फार रागावला आहे. अंगद हा भारताचे माजी स्पिनर बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे. अंगदने काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्न केले. युवराज आणि अंगद यांची मैत्री संपुष्टात यायचं मुख्य कारणही अंगदचं लग्नच आहे.

अंगदने दिल्लीतील एका गुरूद्वाऱ्यात नेहाशी लग्न केले. या लग्नात फार कमी पाहुणे मंडळी होती. अंगद आणि नेहाने फक्त जवळच्या मित्र- मंडळींना आणि कुटुंबाला लग्नात सहभागी केले होते. अंगदकडून गौरव कपूर, अजय जडेजा आणि आशिष नेहराही या लग्नात सहभागी झाले होते. आश्चर्य म्हणजे या लग्नात युवराज सिंगला बोलावण्यात आले नव्हते. आपल्या लहानपणीच्या मित्राच्या लग्नाचं आमंत्रणच न मिळाल्याने युवराज फार नाराज झाला. अंगदनेही एका मुलाखतीत त्याची चूक मान्य केली.

अंगदने पिंकविला वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘ती पूर्णपणे माझी चूक होती. आम्ही अचानक लग्नाचा निर्णय घेतला. युवराज रागावण्याची वेगळी कारणं आहेत. पण हेही खरं आहे की आमचं नातं आता पूर्वीसारखं राहिलं नाही.’ फ्रेंडशिप डेच्या दिवशी युवराजने एक मेसेज सोशल मीडियावर शेअर केला होता. या मेसेजमध्ये त्याने लिहिले की, मला वाटलेलं की आपण मित्र आहोत. पण मी आता नक्कीच सांगू इच्छितो की माझं कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे. मला युवराजची ती गोष्ट पटली नाही. पण ते त्याचं मत आहे.’

युवराज आणि अंगद हे लहानपणीचे मित्र आहेत. दोघांमध्ये एवढी घट्ट मैत्री होती की, दोघं एकमेकांना प्रत्येक गोष्ट शेअर करायचे. एकमेकांच्या सुख दुःखात ते एकमेकांसोबत ढालीसारखे उभे राहायचे. कोणताही कौटुंबिक समारंभ असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात आले आहे. युवराजच्या लग्नातही युवराजच्या भावापेक्षा अंगदच जास्त अक्टीव असल्याचं दिसून आलं होतं.

अंगदने अंडर- १९ क्रिकेट खेळलं आहे. सिमल्याच्या प्रसिद्ध बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अंगदने दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मॉडेलिंग, अँकरिंग आणि अभिनयात आपलं नशीब आजमावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 10:22 AM IST

ताज्या बातम्या