मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

HBD Smriti Mandhana : स्मृती मंधानाच्या द्विशतकात होता द्रविडचा हातभार, वाचा नेमकं काय घडलं

HBD Smriti Mandhana : स्मृती मंधानाच्या द्विशतकात होता द्रविडचा हातभार, वाचा नेमकं काय घडलं

भारतीय महिला क्रिकेट टीमची (Indian Women's Cricket Team) प्रमुख बॅटर स्मृती मंधाना 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्मृतीच्या पहिल्या द्विशतकात टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडचा (Rahul Dravid) हातभार होता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 जुलै: भारतीय महिला क्रिकेट टीमची  (Indian Women's Cricket Team) प्रमुख बॅटर स्मृती मंधाना 25 वा  वाढदिवस साजरा करत आहे. स्मृती ही सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाची प्रमुख खेळाडू आहे. तिने काही दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्धच्या टी20 मध्ये (ENGW vs INDW T20) आक्रमक अर्धशतक झळकावलं होतं. स्मृतीचं हे विदेशातील सातवे टी20 अर्धशतक आहे. टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून विदेशात सर्वात जास्त अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड स्मृतीच्या नावावर आहे.

स्मृतीचा टीम इंडियातील प्रवास मोठा अविस्मरणीय आहे. ती वयाच्या 9 व्या वर्षीच महाराष्ट्राच्या अंडर 19 टीमची सदस्य होती. स्मृतीनं वयाच्या 17 व्या वर्षीच द्विशतक झळकावले होते. वन-डे क्रिकेटच्या प्रकारात द्विशतक करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. स्मृतीने 150 बॉलमध्ये नाबाद 223 रन काढले होते. यामध्ये 32 फोरचा समावेश होता.

राहुल द्रविडचा होता हातभार

स्मृती मंधानाच्या या द्विशतकामध्ये टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडचा (Rahul Dravid) हात होता. आपण द्रविडच्या बॅटनं हे शतक झळकालं असा खुलासा स्मृतीनं गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात केला होता. स्मृतीच्या भावाला ती बॅट द्रविडने दिली होती.

IND vs SL: 'हा तर वीरेंद्र सेहवाग', टीम इंडियातील खेळाडूबाबत मुरलीधरनचं मोठं वक्तव्य

'माझा भाऊ श्रवणने राहुल सरांकडून माझ्यासाठी स्वाक्षरी केलेली बॅट मागितली होती. त्यांनी देखील मोठं मन दाखवून त्यांची बॅट मला दिली. मी ती बॅट पाहिल्यावर आश्चर्यचकित झाले होते. त्या बॅटचे वजन आणि संतुलन कमाल होते. मी त्यानंतर त्या बॅटनं खेळू लागले. माझं वन-डेमधील पहिलं द्विशतक देखील राहुल सरांनी स्वाक्षरी केलेल्या बॅटने आले होते.' असे स्मृतीने सांगितले.

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid