विराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'

विराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'

दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाने विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला.

  • Share this:

भारताचा कर्णधार विराट कोहलीचा सर्वात वेगवान २७ शतकांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने मोडला आहे. पोर्ट एलिझाबेथमध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हाशिम अमलाने शतक साजरे केले.

हाशिम अमला वनडे क्रिकेट सामन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर 27 शतके करणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याने 167 सामन्यात 27 शतके केली असून सर्वात कमी डावात त्याने ही कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात सर्वात वेगवान 27 शतके करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने 169 सामन्यात 27 शतके केली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाचा फॉर्म परत आल्याने संघाच्यादृष्टीने ही एक चांगली बाब ठरली आहे. अमलाने त्याचे शेवटचे शतक 2017 मध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते. 2018 या वर्षात त्याला एकही शतकी खेळी करता आली नाही.

अमलाच्या या आधीच्या शतकानंतर विराट कोहलीने 9 आणि रोहित शर्माने 8 शतके केली आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हाशिम अमलाने 120 चेंडूत 108 धावा काढल्या. अमलाच्या शतकामुळे आफ्रिकेला 2 बाद 266 धावा केल्या.

वनडे सामन्यात 27 शतकांची कामगिरी आतापर्यंत 5 खेळाडूंनी केली आहेत. यामध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याने 404 डावात तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने 308 डावात हा टप्पा ओलांडला आहे.

भारताकडून विराट कोहलीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 254 सामन्यात 27 शतके केली होती. सध्या विराट कोहलीची 39 शतके झाली आहेत. वनडेत सर्वाधिक 51 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 02:04 PM IST

ताज्या बातम्या