मुंबई, 23 ऑगस्ट: भारतीय क्रिकेटपटूकडून देश सोडून अमेरिकेत क्रिकेट खेळण्याचं प्रमाण वाढत आहे. अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) यानं काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. भारतामध्ये खेळण्याची संधी मिळत नसल्यानं उन्मुक्तनं हा निर्णय घेतला होता. आता त्यापाठोपाठ त्याच्या टीममधील मुंबईकरान खेळाडूनं अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईचा स्पिनर आणि अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा खेळाडू हरमीत सिंह (Harmeet Singh) यानं अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीग (MCL) स्पर्धेत खेळण्यासाठी तीन वर्षांचा करार केला आहे. हरमीतनं 31 फर्स्ट क्लास मॅचमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये त्यानं 733 रन काढले आणि 87 विकेट्स घेतल्या.
28 वर्षांच्या हरमीतनं मुंबईकडून मिळणारी कमी संधी आणि एमसीएल लीगमध्ये मिळणारे चांगले पैसे याचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'मी जुलै महिन्यातच रिटायर झालो होते. मुंबईकडून खेळायला न मिळाल्यानं मी हा निर्णय घेतला होता. आता मला अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी चांगले पैसे मिळत आहेत. त्यामुळे मला सुरक्षितता लाभली आहे. इथं क्रिकेटचा स्तर देखील चांगला आहे.'
हरमीतनं पुढं सांगितलं की, 'मी 2009 साली मुंबईकडून पदार्पण केले होते. पण मला कधीही एक सिझन पूर्ण खेळण्याची संधी मिळाली नाही. मी 2017 पर्यंत मुंबईकडून खेळण्याच्या माझ्या स्वप्नाचा पाठलाग केला. जवळपास एक दशकामध्ये मला मुंबईकडून फक्त 9 मॅच खेळण्याची संधी मिळाली. मला अयशस्वी होण्याचा किंवा स्वत:ला सिद्ध करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.'
हॉटेलमधील रूम पाहून साक्षी धोनीला आठवला हनीमून, लाजून म्हणाली...
हरमीतनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एक शतकही झळकावले आहे. तसंच 19 A श्रेणीच्या लढतीत 21 विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचाही सदस्य होता, पण त्याला फक्त एक मॅच खेळण्याची संधी मिळाली. हरमीतच्या पूर्वी उन्मुक्त चंद, मिलिंद कुमार, समित पटेल, मनन शर्मा आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांनीही भारतीय क्रिकेट सोडून अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news