• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL आणि T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का? कोचनं दिलं अपडेट

IPL आणि T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का? कोचनं दिलं अपडेट

हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) श्रीलंका दौऱ्यात कमाल करता आली नव्हती. त्याचबरोबर फिटनेसच्या कारणामुळे त्यानं नियमित बॉलिंग केलेली नाही.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑगस्ट: टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर असली तरी अनेक खेळाडूंना सध्या पुढील महिन्यात सुरु होणारी आयपीएल (IPL 2021) आणि त्यानंतर होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2021) वेध लागले आहेत. टी वर्ल्ड कपपूर्वी भारतीय टीम कोणतीही सीरिज खेळणार नाही. त्यामुळे त्यांना आयपीएल स्पर्धेतच वर्ल्ड कपची तयारी करावी लागणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू सध्या फॉर्मात असले तरी ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फॉर्म हा काळजीचा विषय आहे. हार्दिक पांड्याला श्रीलंका दौऱ्यात कमाल करता आली नव्हती. त्याचबरोबर फिटनेसच्या कारणामुळे त्यानं नियमित बॉलिंग  केलेली नाही. हार्दिकच्या फिटनेसबाबत नॅशनल क्रिकेट अकादमीचे (NCA) बॉलिंग कोच पारस म्हांब्रेनं (Paras Mhambrey) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर हार्दिक एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत असून म्हांब्रे त्याला मार्गदर्शन करत आहे. हार्दिक पांड्या लवकरच नियमित बॉलिंग करेल अशी अपेक्षा म्हांब्रेनं व्यक्त केली आहे. IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं. 'हार्दिकच्या प्रकरणात आम्ही सावकाश पुढे जात आहोत. त्यानं किती ओव्हर्स बॉलिंग करावी याचा दबाव मी टाकणार नाही. पण त्याच्यावर नियमित लक्ष ठेवले जात आहे. आपल्याला त्याला हळूहळू तयार करावं लागणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धा जवळ आलीय. त्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक किती महत्त्वाचा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे त्याला वर्कलोड नीट मॅनेज करावा लागेल.' असं म्हांब्रेनं स्पष्ट केलं. हार्दिक बॉलिंग करण्यासाठी किती तयार आहे हे आयपीएल स्पर्धेत समजेल असे म्हांब्रे यावेळी म्हणाला. 'माझ्या अंदाजानुसार तो आयपीएलमध्ये बॉलिंग करेल. आयपीएल स्पर्धा हे पहिलं पाऊल आहे. कदाचित त्याची टीम (मुंबई इंडियन्स) हार्दिकचा कसा वापर करायचा याचा निर्णय घेईल. तो वर्ल्ड कपसाठी किती तयार आहे हे आयपीएल स्पर्धेत स्पष्ट होईल.' IND vs ENG: इंग्लंडच्या जखमेवर माजी कॅप्टननं चोळलं मीठ, जो रूटच्या टीमला म्हणाला... हार्दिक टीम इंडियाबरोबर श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्या सीरिजमध्ये त्यानं काही ओव्हर्स बॉलिंग केली. मात्र अजूनही त्याची पाठदुखी कायम आहे. यापूर्वी त्यानं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्येही काही ओव्हर बॉलिंग केली होती. टीम इंडियातील संतुलन कायम ठेवण्यासाठी हार्दिकनं बॉलिंग करणे आवश्यक आहे असं कॅप्टन विराट कोहलीनं यापूर्वी सांगितलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: