मुंबईत आल्यावर मराठीमध्येच बोलणार!, हार्दिक पांड्याचा VIDEO पाहिलात का?

मुंबईत आल्यावर मराठीमध्येच बोलणार!, हार्दिक पांड्याचा VIDEO पाहिलात का?

भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचा मराठीमध्ये बोलतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचा मराठीमध्ये बोलतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मुंबईमध्ये आल्यावर आपण मराठीमध्येच बोलणार असल्याचं हार्दिक या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ टाकला आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएलवेळचा हा व्हिडिओ आहे. कसं काय हार्दिक भाऊ? असा प्रश्न मुंबईने हा व्हिडिओ शेयर करताना विचारलं आहे. हार्दिक पांड्यानेही या व्हिडिओवर एक नंबर, अशी कमेंट केली आहे.

'काय म्हणताय, सगळं बरं आहे ना? आमची मुंबई.सगळं ठीक आहे. इकडे गरमी प्रचंड आहे. मी मराठी शिकत आहे. मुंबईमध्ये आल्यानंतरही मराठीमध्ये बोलणार आहे. मी मराठी बोलायला शिकत आहे आणि मला मराठी कळंत. इकडेच माझा सराव सुरू आहे,' असं हार्दिक या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडून हार्दिक मराठीचे धडे घेत आहे.

ऑस्ट्रेलियात धमाकेदार कामगिरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये हार्दिक पांड्याने धमाकेदार कामगिरी केली. वनडे सीरिजमध्ये हार्दिकने 90, 28 आणि नाबाद 92 रनची खेळी केली. तर टी-20 सीरिजमध्ये त्याने 16, नाबाद 42 आणि 20 रन केले. टी-20 सीरिजमध्ये पांड्याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी आयपीएलमध्येही हार्दिक पांड्याने धडाकेबाज कामगिरी केली होती. मुंबईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवण्यात हार्दिक पांड्याने मोलाची भूमिका बजावली होती. ऑलराऊंडर असलेल्या हार्दिकने आयपीएलमध्ये बॉलिंग केली नव्हती, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फक्त एका मॅचमध्ये काही ओव्हर टाकल्या होत्या. मागच्या वर्षी हार्दिकच्या पाठीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून लांब होता. बॉलिंग करण्यासाठी अजून शरीर तयार झालं नसल्याची प्रतिक्रिया हार्दिकने दिली होती.

Published by: Shreyas
First published: December 12, 2020, 9:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या