हार्दिकने खरेदी केली धोनी-कोहलीपेक्षा महाग गाडी; किमत आणि मायलेज पाहून बसेल धक्का!

हार्दिकने खरेदी केली धोनी-कोहलीपेक्षा महाग गाडी; किमत आणि मायलेज पाहून बसेल धक्का!

भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर,स्टार क्रिकेटपटू हार्दिक आणि कुणाल पांड्या यांनी लॅम्बॉर्गिनी कार (Lamborghini car) विकत घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर, स्टार क्रिकेटपटू हार्दिक आमि क्रुणाल पांड्या यांनी लॅम्बॉर्गिनी कार (Lamborghini car) विकत घेतली आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत ऑरेंज कलरच्या लॅम्बॉर्गिनी गाडीसह पाहण्यात आले होते. या गाडीसह दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक आणि क्रुणाल यांनी वांद्रयातील एका जिम बाहेर नवी गाडी पार्क केली होती. भारतीय संघाचा संध्या वेस्ट इंडिज दौरा सुरू आहे. या दौऱ्यासाठी हार्दिकला विश्रांती देण्यात आली आहे. वर्ल्ड कप झाल्यानंतर भारतीय संघाच्या या पहिल्या दौऱ्यात हार्दिकचा भारतीय संघात समावेश नाही.

हार्दिकने वर्ल्ड कपमधील सर्व 9 सामने खेळले होते. तसेच गोलंदाजीसोबत फलंदाजी देखील केली होती. हार्दिकने 10 विकेट घेण्याबरोबच 226 धावा देखील काढल्या होत्या. पण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिन्ही क्रिकेट प्रकारात हार्दिकला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याचा भाऊ क्रुणाल याला टी-20 संघात स्थान देण्यात आले होते.

सर्वात महाग गाडी

पांड्या बंधूंनी घेतलेली लॅम्बॉर्गिनी कार भारतीय क्रिकेटपटूमध्ये असलेली सर्वात महाग गाडी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे सर्वात महाग अशी 3 कोटीची गाडी आहे. तर माजी कर्णधार आणि गाडी तसेच बाईकची आवड असलेल्या महेंद्र सिंग धोनीने अलीकडेच जीप शेरोकी गाडी खरेदी केली होती. त्याची किमत 1 कोटीच्या आसपास आहे. पांड्या बंधूंनी घेतलेल्या गाडीची किमत 3 ते 5 कोटी असल्याचे समजते. ही गाडी हायटेक असून त्याचा इंटिरिअल देखील जबरदस्त आहे. विशेष म्हणजे इतक्या महाग गाडीत केवळ दोघेच बसू शकतात. या गाडीचे इंजिन केवळ 515 ते 544 किलोवॉट हॉर्सपॉवर इतके आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या या गाडीत 90 लिटर पेट्रोल साठवण्याची क्षमता आहे. गाडीचे मायलेज 5-7 किलोमीटर प्रति लिटर आहे.

क्रुणालने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-30 मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या ऑलराऊंड खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजवर 3-0 असा विजय मिळवला होता. हार्दिक आणि क्रुणाल हे दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 17, 2019, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading