सिडनी, 11 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वन डे सामना उद्या खेळणार आहे. हार्दीक पांड्या आणि केएल राहूल यांना प्लेइंग इलेवनमधून वगळण्यात आलं असल्याची माहिती प्रशासन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिली. यापुढील सामनेही त्यांना खेळता येणार नाहीत.
एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात असलेल्या या दोन्ही खेळाडूंना आता मायदेशी परतावं लागणार आहे. बीसीसीआयकडून चौकशी होण्यासाठी १५ दिवस लागणार आहेत. ही चौकशी होईपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पांड्याने एका टीव्ही शोमध्ये महिलांबद्दल वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. याबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार पांड्या उद्या (शनिवार) होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही. याबद्दलचा अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही.
'त्या' कमेंट्समुळे हार्दिक पांड्या आणि राहुलला BCCI ने बजावली नोटीस
ऑस्ट्रेलियाचं मैदान गाजवणारे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कॉफी विथ करण या करण जोहरच्या टॉक शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के. एल राहुल यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात या दोघांनी केलेल्या लूज कमेंट्समुळे हे दोन खेळाडू अडचणीत आले आहेत.