Home /News /sport /

फक्त एक खेळाडू सोडून 2003 वर्ल्ड कपची 'टीम इंडिया' निवृत्त

फक्त एक खेळाडू सोडून 2003 वर्ल्ड कपची 'टीम इंडिया' निवृत्त

भारताचा विकेटकीपर-बॅट्समन पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्थिव पटेल शेवटची टेस्ट मॅच खेळला.

    मुंबई, 11 डिसेंबर : भारताचा विकेटकीपर-बॅट्समन पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्थिव पटेल शेवटची टेस्ट मॅच खेळला. पार्थिव पटेल 2003 वर्ल्ड कपच्या भारतीय टीममधला निवृत्त होणारा शेवटून दुसरा खेळाडू बनला आहे. 2003 वर्ल्ड कपमध्ये पार्थिव पटेलला खेळण्याची एकही संधी मिळाली नाही, कारण राहुल द्रविडने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये कीपिंग केली होती. त्या टीममधला आता एकच खेळाडू आहे, ज्याने अजूनपर्यंत संन्यास घेतलेला नाही. 2003 वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने अजून क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्या वर्ल्ड कपमध्ये हरभजनने 10 मॅचमध्ये 11 विकेट घेतल्या होत्या. बराच काळ हरभजन भारताकडून खेळला नसल्यामुळे आता त्याची खेळण्याची शक्यताही कमी आहे. हरभजन सिंग 2016 साली युएईमध्ये भारताकडून शेवटची टी-20 खेळला होता. तर त्याने शेवटची वनडे आणि टेस्ट 2015 साली खेळली होती. हरभजनने 103 टेस्ट, 236 वनडे आणि 28 टी-20 मॅच खेळल्या. त्याच्या नावावर टेस्टमध्ये 417 विकेट, वनडेमध्ये 269 विकेट आणि 25 टी-20 विकेट घेतल्या. हरभजनने खेळली नाही आयपीएल हरभजनने या काळात कॉमेंट्रीही केली आणि तो आयपीएलमध्येही खेळला. आयपीएलमध्ये हरभजन मुंबईकडून खेळला, पण 2018 सालापासून तो चेन्नईच्या टीमचा भाग होता. या आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसमुळे हरभजनने माघार घेतली. 2003 वर्ल्ड कप टीममधल्या हरभजनशिवाय सगळ्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. त्या टीमचा कर्णधार सौरव गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष झाला आहे, तर राहुल द्रविड सध्या एनसीएमध्ये प्रमुख आहे. हरभजन मात्र पुढची आयपीएल खेळणार का नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या