Home /News /sport /

हरभजन राजकारणात जाणार की IPL टीमचा कोच होणार? वाचा भज्जीनं काय दिलं उत्तर

हरभजन राजकारणात जाणार की IPL टीमचा कोच होणार? वाचा भज्जीनं काय दिलं उत्तर

निवृत्तीनंतर हरभजन (Harbhajan Singh) राजकारणातील इनिंग गाजवणार की आयपीएल टीमचा कोच म्हणून काम करणार याचा चर्चा सुरू झाली आहे.

    मुंबई, 25 डिसेंबर : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने शुक्रवारी सोशल मीडियावर ही घोषणा केली. निवृत्तीनंतर हरभजन राजकारणातील इनिंग गाजवणार की आयपीएल टीमचा कोच म्हणून काम करणार याचा चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाकडून 711 विकेट्स घेणाऱ्या या माजी बॉलरनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंग सिद्धूसोबतचा (Navjot Singh Siddhu) हरभजनचा एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. पंजाबमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हरभजन काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. भज्जीनं या विषयावर अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हरभजननं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'मी पुढे काय करणार हे सध्या सांगू शकत नाही. मला यावर विचार करण्यासाठी 2-3 दिवस लागतील. मला लोकांमध्ये परत येण्याची इच्छा आहे. पण, मी राजकारणात प्रवेश करेन की अन्य कामं करेल यावर विचार करण्याची गरज आहे. कारण राजकारणात प्रवेश केला तर लोकांना मदत करणे हाच माझा माझा मुख्य उद्देश असेल. हरभजननं स्पष्ट सांगितलं नसलं तरी पंजाब विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे, असं मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कारण, त्याला पक्षाचं तिकीट देताना तो प्रचारासाठी किती काळ उपलब्ध असेल याचा विचार केला जाईल. मी क्रिकेटशी जोडलेला असेन असे हरभजनने स्पष्ट केले आहे. आयपीएल टीमचा कोच, त्यांचा मेंटॉर किंवा सिनिअर क्रिकेटपटूंच्या लीगमध्ये मी खेळू शकतो, असे त्याने सांगितले आहे. Ashes Series: इंग्लंडचा शेवटचा प्रयत्न, मेलबर्न टेस्टसाठी टीममध्ये 4 मोठे बदल हरभजनने 1998 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने टीम इंडियाकडून 103 टेस्टमध्ये 417 विकेट्स घेतल्या. तसंच 2 शतकांसह 2235 रन काढले. तर 236 वन-डेमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. टी20 इंटरनॅशनलमध्ये हरभजनच्या नावावर 28 मॅचमध्ये 25 विकेट्सचू नोंद आहे. टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि आर. अश्विन (427) यांच्यानतर हरभजननं सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Harbhajan singh, Ipl, Punjab

    पुढील बातम्या