सचिन-द्रविडसारख्या दिग्गजांची घेतली होती विकेट, सेक्स टेपमुळे झाला बदनाम

सचिन-द्रविडसारख्या दिग्गजांची घेतली होती विकेट, सेक्स टेपमुळे झाला बदनाम

न्यूझीलंडच्या टीममध्ये असे काही फास्ट बॉलर झाले ज्यांच्यामध्ये गुणवत्ता होती, पण त्यांचे आंतरराष्ट्रीय करियर अल्पजीवी ठरले.या फास्ट बॉलरपैकी एक होता डॅरेल टफी. त्याचा आज वाढदिवस (Hapyy Birthday Daryl Tuffey) आहे

  • Share this:

मुंबई, 11 जून: न्यूझीलंडच्या टीममध्ये असे काही फास्ट बॉलर झाले ज्यांच्यामध्ये गुणवत्ता होती, पण त्यांचे आंतरराष्ट्रीय करियर अल्पजीवी ठरले. या फास्ट बॉलरपैकी एक होता डॅरेल टफी. त्याचा आज वाढदिवस  (Hapyy Birthday Daryl Tuffey) आहे. 11 जून 1978 रोजी ओटोगोमध्ये जन्मलेला टफी आज 43 वर्षांचा झाला आहे. टफी न्यूझीलंडकडून 26 टेस्ट, 94 वन-डे आणि 3 टी 20 मॅच खेळला. यामध्ये त्याने एकूण 191 विकेट्स घेतल्या. टफीने त्याच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त टीम इंडियाला त्रस्त केले.

टफी नव्या बॉलचा स्पेशालिस्ट बॉलर होता. त्याची लाईन आणि लेन्थ अचूक होती. त्याने 26 टेस्टमध्ये 77 तर 94 वन-डेमध्ये 110 विकेट्स घेतल्या. टफीने सर्वात जास्त 32 विकेट्स पाकिस्तानविरुद्ध घेतल्या. तर भारताविरुद्ध त्याने 24 विकेट्स घेकतल्या. भारताविरुद्ध 4 टेस्टमध्ये त्याने 21 विकेट्स घेतल्या. यामध्ये राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर सारख्या बड्या विकेट्सचाही समावेश होता.

चुकीच्या कारणामुळे चर्चेत

टफी अचूक लाईन आणि लेन्थसाठी ओळखला जात असे. मात्र 2005 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 14 बॉलची ओव्हर टाकली.  त्याने पहिला वैध बॉल टाकण्यापूर्वी 14 रन दिले होते. इतकच नाही तर त्या वर्षी एका सेक्स स्कँडलमध्ये त्याचे नाव समोर आले.

23 वर्षांपूर्वी खेळल्या होत्या भारताच्या 2 टीम, वाचा काय होता तेव्हाचा निकाल

ब्रिटनमधील दोन पर्यटकांनी त्याची सेक्स टेप (Sex Tape) बनवली.  ख्राईस्टचर्चमधील एक पबमध्ये त्याचे प्रसारण करण्यात आले होते. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये त्याच्यावर 1 हजार डॉलरचा दंड आकारण्यात आला. त्यानंतर दोन वर्षांनी 2007 साली टफी ऑकलंडमध्ये दारु पिऊन गाडी चालवतानाही पकडला गेला. इंडियन सुपर लीग (ISL) स्पर्धेत चंदीगड लॉयन्सकडून खेळताना त्याच्यावर फिक्सिंगचाही आरोप झाला.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 11:44 AM IST

ताज्या बातम्या