मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /HBD Virat Kohli: विराटच्या वाढदिवशी अनुष्कानं शेअर केला इमोशनल मेसेज

HBD Virat Kohli: विराटच्या वाढदिवशी अनुष्कानं शेअर केला इमोशनल मेसेज

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आज 33 वा वाढदिवस (Virat Kohli Birthday) साजरा करत आहे. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) या निमित्तानं दोघांचा एक खास फोटो शेअर केला असून एक भावुक मेसेज लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 5 नोव्हेंबर: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आज 33 वा वाढदिवस (Virat Kohli Birthday) साजरा करत आहे. विराटला वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहे. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) या निमित्तानं दोघांचा एक खास फोटो शेअर केला असून एक भावुक मेसेज लिहून तिच्या विराटबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनुष्का शर्मानं विराट कोहलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहलं आहे की, 'या फोटोप्रमाणे तुझं आयुष्य आहे. त्याला कोणत्याही फिल्टरची गरज नाही. तुझा स्वभावान प्रामाणिक आणि धाडसी आहे. एखाद्या अंधाऱ्या जागेतून उठून स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता असलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही.

अनुष्कानं पुढं लिहलं आहे की, ' तू प्रत्येक बाबतीच चांगला होत आहेस. कारण तो कोणतीही गोष्ट स्थायी आहे, असं मानत नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणारे नाहीत, हे मला माहिती आहे. पण तू किती भारी माणूस आहेस  हे मला कधी-कधी जगाला ओरडून सांगावं वाटतं. तुला ओळखणारे सर्व जण भाग्यवान आहेत. सर्व काही उज्जवल आणि सुंदर केल्याबद्दल धन्यवाद. आणि हो हॅप्पी बर्थ डे क्यूटनेस.'

विराट कोहलीनं 18 ऑगस्ट 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 2008 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. तसंच 2011 साली वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा तो सदस्य होता. विराट सध्या तीन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन आहे. यूएईमध्ये सध्या सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाची कॅप्टनसी सोडणार असल्याचं विराटनं जाहीर केलं आहे.

विराटच्या 2 इच्छा आज पूर्ण झाल्या तर कॅप्टनला मिळेल सर्वात मोठं बर्थ-डे गिफ्ट

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Cricket news, Virat kohli