Happy Birthday Rohit: याला म्हणतात सुखाची झोप! रोहितचा लेकीबरोबरचा गोड Photo

Happy Birthday Rohit: याला म्हणतात सुखाची झोप! रोहितचा लेकीबरोबरचा गोड Photo

मुंबई इंडियन्सचा (MI) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा आज 34 वा वाढदिवस आहे. रोहितचा त्याच्या लेकीसोबतचा गोड फोटो सध्या व्हायरल (Viral) झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : मुंबई इंडियन्सचा (MI) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा आज 34 वा वाढदिवस आहे. रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सनं आजवर पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. यावर्षी सलग तीनदा आयपीएल स्पर्धा जिंकण्याची ऐतिहासिक संधी मुंबई इंडियन्सला आहे.

मुंबई इंडियन्सची टीम चेन्नईत पाच सामने खेळल्यानंतर आता दिल्लीत दाखल झाली आहे. दिल्लीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईनं 7 विकेट्सनं विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

आयपीएल स्पर्धेच्या धामधुमीत येणारा रोहित शर्माचा वाढदिवस हा त्याच्या आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी मोठा दिवस असतो. सकाळपासूनच जगभरातून रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेट फॅन्ससह रोहितचे सहकारी, माजी क्रिकेटपटू आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी टीम इंडियाच्या हिटमॅनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. #HappyBithdayRohit #RohitSharma #HappyBirthdayRohitSharma हे ट्रेंड  ट्विटरवर टॉपवर आहेत.

मुंबई इंडियन्सनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर  रोहित शर्माचा त्याची लाडकी लेक समायरा (Samaira) सोबतचा एक गोड फोटो या निमित्तानं शेअर केला आहे. मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये रोहित शर्मा समायराच्या मांडीवर झोपला असून समायरा तिच्या लाडक्या बाबांना प्रेमानं थोपटत आहे. इंटरनेटवरील आजचा सर्वात सुंदर फोटो असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलंय. हा फोटो सध्या वेगानं व्हायरल होत आहे.

आयपीएलमध्ये शायनिंग इंडिया, 14 वर्षांत पहिल्यांदाच घडतोय असा इतिहास

क्रिकेटच्या मैदानात सर्व बॉलर्सची झोप उडवणारा रोहित लेकीच्या मांडीवर आरामात झोपला आहे. रोहितची ही सुखाची झोप सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनली असून त्यावर तितक्याच गोड प्रतिक्रिया येत आहेत.

Published by: News18 Desk
First published: April 30, 2021, 4:03 PM IST

ताज्या बातम्या