पृथ्वीवर बंदी, सरकारने BCCIला सुनावले होते खडे बोल

पृथ्वीवर बंदी, सरकारने BCCIला सुनावले होते खडे बोल

बीसीसीआयने भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर 8 महिन्यांची बंदी घातली आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानं बीसीसीआय़ने त्याच्यावर 8 महिन्याची बंदी घातली आहे. पृथ्वीवर बंदीची कारवाई होण्याआधी सरकारने बीसीसीआय़ला फटकारले होते. डोपिंग टेस्टच्या प्रक्रियेवरून सरकारने बीसीसीआयला खडेबोल सुनावत पत्र लिहलं होतं. यात उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये असलेल्या त्रुटींबद्दल उल्लेख करण्यात आला होता.

इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय़ला डोपिंग चाचणीचा अधिकार नाही. त्यांना भारत सरकार किंवा वाडाकडून अधिकारही देण्यात आलेले नाहीत. क्रीडा मंत्रालयाने 26 जूनला याबाबत बीसीसीआय़ला पत्र लिहलं होतं. वाडाच्या नियमानुसार खेळाडूंच्या डोपिंग चाचणीचा अधिकार अधिकृत अँटी डोपिंग संस्थेलाच आहे. बीसीसीआयकडे वाडाच्या नियमानुसार अँटी डोपिंगचा अधिकार नाही.

बीसीसीआयला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीशी जोड़ण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सरकारसोबत वाद सुरू आहे. देशातील इतर खेळातील खेळाडू नाडा अंतर्गत येतात मात्र बीसीसीआय़ यामध्ये येत नाही. याबाबात बीसीसीआयने म्हटलं होतं की, नाडाच्या प्रक्रियेत अनेक कमतरता आहेत.

क्रीडा मंत्रालयानं त्यांच्या पत्रात बीसीसीआयच्या दाव्याला फेटाळून लावलं आहे. बीसीसीआयचा भारताचे क्रिकेट स्वच्छ आणि डोपिंग मुक्त ठेवण्यासाठी व्यवस्था असल्याचा दाव्यात तथ्य नाही. 2018 मध्ये बीसीसीआयने 215 सँपल नॅशनल डोप टेस्टिंग लॅबमध्ये पाठवले होते. यातील 5 पॉझिटिव्ह होते. मात्र ते नमुने कोणाचे होते आणि त्यावर काय कारवाई झाली याची माहिती पुढे आली नाही.

SPECIAL REPORT : 'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांनी का उचलले टोकाचे पाऊल?

Published by: Suraj Yadav
First published: August 1, 2019, 10:45 AM IST
Tags: BCCI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading