Home /News /sport /

IPL 2021: चेन्नईसाठी Good News, धोनीच्या मित्रानं झळकावलं वादळी शतक

IPL 2021: चेन्नईसाठी Good News, धोनीच्या मित्रानं झळकावलं वादळी शतक

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) चांगली बातमी आहे. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी (IPL 2021 2nd Phase) सीएसकेच्या प्रमुख खेळाडूनं वादळी शतक झळकावलं आहे.

    मुंबई, 5 सप्टेंबर : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) चांगली बातमी आहे. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वी (IPL 2021 2nd Phase) सीएसकेचा प्रमुख खेळाडू फाफ ड्यू प्लेसिसनं वादळी शतक झळकावलं आहे. वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेत त्यानं ही आक्रमक खेळी केली. ड्यू प्लेसिसनं सेंट किट्स एंड नेविस पेट्रियट्स विरुद्ध ही खेळी केली. तो या सिझनमध्ये सेंट लूसिया किंग्सचा (ST.lucia Kings) कॅप्टन आहे. ड्यू प्लेसिनं सीपीएलमधील पहिलं शतक फक्त 51 बॉलमध्ये पूर्ण केलं. त्यानं या 60 बॉलमध्ये नाबाद 120 रन केले. या खेळीच्या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 200 होता. या खेळीत त्यानं 13 फोर आणि 5 सिक्स लगावले. ड्यू प्लेसीचा टी20 क्रिकेटमधील हा सर्वोच्च स्कोअर आहे. त्यानं यापूर्वी 2015 साली वेस्ट इंडिज विरुद्ध 119 रनची खेळी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच त्यानं टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. ड्यू प्लेसिसचा या मॅचपूर्वी या स्पर्धेतील फॉर्म खास नव्हता. त्यानं पहिल्या 4 मॅचमध्ये फक्त 26 रन काढले होते. पण शनिवारी त्यानं टीमसाठी कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याच्या शतकामुळे त्याच्या टीमनं 20 ओाव्हर्समध्ये 2 आऊट 224 रन केले. त्याला उत्तर देताना सेंट किट्सची इनिंग 124 रनवर संपुष्टात आली. त्यामुळे सेंट किट्सचा या मॅचमध्ये 100 रननं मोठा पराभव झाला. IND vs ENG : सचिन-सेहवाग नाही तर शतकांच्या 'या' विक्रमामध्ये रोहित आहे नंबर 1 डोक्याला झाली होती दुखापत ड्यू प्लेसिस यापूर्वी जून महिन्यात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत (PSL) जखमी झाला होता. या स्पर्धेत फिल्डिंग करताना त्याच्या डोक्याला बॉल लागला होता. त्यामुळे नंतर त्यानं पीएसएल स्पर्धेतून माघार घेतली. तसंच इंग्लंडमध्ये झालेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेतही तो खेळला नव्हता. त्यानं सीपीएल स्पर्धेतूनच क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Csk

    पुढील बातम्या