Home /News /sport /

अजब! 'क्रिकेटच्या इतिहासात 'भूता'नं घेतली पहिली विकेट', रहस्यमयी घटनेचा VIDEO VIRAL

अजब! 'क्रिकेटच्या इतिहासात 'भूता'नं घेतली पहिली विकेट', रहस्यमयी घटनेचा VIDEO VIRAL

झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश (Zimbabwe Vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात एक रहस्यमयी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मुंबई, 26 जुलै: झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश  (Zimbabwe vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात एक रहस्यमयी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मॅचमध्ये स्टंपच्या जवळ बॅट्समन किंवा फिल्डर नव्हता, तरीही स्टम्पवरील बेल्स खाली पडल्या. बांगलादेशच्या इनिंगमधील 18 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. मोहम्मद सैफूद्दीन (Mohammad Saifuddin) स्ट्राईकवर होता. झिम्बाब्वेच्या तेंदई चतराच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर झिम्बाब्वेचं भाग्य उजळलं. सैफूद्दीननं पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना अचानक बेल्स खाली पडल्या. त्यावेळी तो खरंच हिट-विकेट झाला होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विचित्र परिस्थितीचा तपास करण्यासाठी अंपायरची मदत घेण्यात आलीा. त्यावेळी समोर आलेल्या फुटेजमधून या घटनेचा उलगडा झाला. स्टंपवरील बेल्स हवेनं पडल्या. सैफुद्दीनचा पाय स्टम्पपासून दूर होता. या बेल्स कुणी पाडल्या याचा खुलासा काही होऊ शकला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. 'क्रिकेट मॅचमध्ये भूतानं घेतलेली पहिली विकेट' या कॅप्टशनसह हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. IND vs ENG : अखेर ठरलं! 2 मुंबईकर होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा झिम्बाब्वे आणि बांगालादेश यांच्यातील हा दुसरा टी 20 सामना यजमान झिम्बाब्वेनं 23 रननं जिंकला. त्यानंतर रविवारी झालेला तिसरा टी20 सामना बांगलादेशनं 5 विकेट्सनं जिंकत तीन सामन्यांची मालिका 2-1 नं जिंकली आहे. या मालिकेतील एकमेव टेस्ट बांगलादेशनं जिंकली होती. त्यानंतर वन-डे मालिका 3-0 नं जिंकली. त्यापाठोपाठ टी20 मालिका देखील जिंकत बांगलादेशनं या दौऱ्याची यशस्वी सांगता केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या