गोलंदाजाला टाकलं गोंधळात, पाठ दाखवून मारला चौकार; VIDEO पाहिलात का?

गोलंदाजाला टाकलं गोंधळात, पाठ दाखवून मारला चौकार; VIDEO पाहिलात का?

क्रिकेटच्या मैदानावर कधी काय होईल सांगता येत नाही. आता ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने फलंदाजीवेळी केलेली करामत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल सांगता येत नाही. कोणी वेगवान धावा काढतात तर कोणी झटपट फलंदाजांना बाद करतात. कधी कधी खेळाडूंमध्ये परस्परांत वादही होतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फलंदाजांचे काही शॉट प्रसिद्ध आहेत. सर्वांना माहिती असलेला असा शॉट सांगायचा झाला तर धोनीचा हेलिकॉप्टर शॉट सांगता येईल. आता एका फलंदाजाने चेंडू मारण्याआधी गोलंदाजाला पाठ दाखवल्याच्या प्रकाराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

फलंदाजीवेळी क्रिकेटपटू गोलंदाजाकडे लक्ष ठेवून असतात पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीने सरळ सरळ पाठच फिरवली. एवढंच नाही तर त्याने चौकारही लगावला. याआधी खेळाडू रिव्हर्स स्वीप मारताना किंवा फार तर बसून आडवी बॅट फिरवून चित्रविचित्र फटके मारताना दिसले असतील. मात्र, बेली असा काही उभा राहिला की त्यामुळे गोलंदाज पुरता गोंधळून गेला.

ऑस्ट्रेलियात एका स्थानिक सामन्यावेळी जॉर्ज बेली फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियातील टास्मानिया या संघातून तो खेळत असताना गोलंदाजाकडे पाठ करून उभा राहिला. त्यानंतरही गोलंदाजाने चेंडू टाकला त्यावर बेलीने चौकार लगावला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पोरांची फी बाकी, मंत्रालयासमोर आत्महत्याच करेन; पवारांसमोर शेतकरी ढसाढसा रडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या