वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळं शतक हुकलं; गंभीरचा खळबळजनक आरोप

वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळं शतक हुकलं; गंभीरचा खळबळजनक आरोप

गंभीरने महेंद्र सिंग धोनी संदर्भात एक खळबळजनक विधान केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: शतकी खेळी करणे कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि अशी शतकी खेळी जेव्हा वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत असतो तेव्हा तर अशी खेळी ही करिअरमधील सर्वोत महत्त्वाची ठरते. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा त्याच्या सडेतोड विधानांसाठी ओळखला जातो. सध्या खासदार असलेला गंभीरने महेंद्र सिंग धोनी संदर्भात एक खळबळजनक विधान केले आहे.

भारतीय संघाने 2011च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. वानखेडे मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात गंभीरने 97 धावांची शानदार खेळी केली होती. या सामन्यात गंभीरला शतक साजरे करता आले नाही. वर्ल्ड फायनलमधील सामन्यात शतक हुकल्याचे दु:ख गंभीरला आजही आहे. पण अंतिम सामन्यात शतक करता आले नाही याला धोनी जबाबदार असल्याचे वक्तव्य गंभीरने केले आहे. सामन्यात जेव्हा मी 97 धावांवर खेळत होतो तेव्हा धोनीने मला सांगितले आणखी 3 धावा कर आणि तुझे शतक पूर्ण होईल. धोनीच्या नेमक्या या वाक्यामुळे मी विचलीत झालो आणि थिसारा परेराच्या चेंडूवर बाद झाल्याचे गंभीर म्हणाला.

मला अनेक वेळा विचारण्यात आले की, अंतिम सामन्यात 97 धावांवर खेळत असताना नेमक काय झाले. सामना खेळत असताना मी वैयक्तीक धावांचा विचार करत नव्हतो. श्रीलंकेने दिलेल्या टार्गेटचा विचार डोक्यात होता. ओव्हर संपल्यानंतर धोनी माझ्या जवळ आला आणि त्याने मला सांगितले की, फक्त 3 धावा शिल्लक आहेत. या 3 धावा कर आणि तुझे शतक पूर्ण होईल. धोनीच्या त्या वाक्यामुळे शतकी खेळी होणार या विचाराने मी विचलीत झालो आणि त्याचा परिणाम असा झाला की मी परेराच्या चेंडूवर बाद झालो. त्या 3 धावा मला आयुष्यभर त्रास देतील.अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती आणि त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

अर्थात धोनीवर अशा पद्धतीने बोलण्याची गंभीरची ही पहिली वेळ नाही. याआधी गंभीरने धोनीच्या कर्णधापदावर आणि त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. धोनी कर्णधार असतानाच्या रोटेशन पद्धतीवर देखील गंभीरने टीका केली होती.

First published: November 18, 2019, 2:29 PM IST

ताज्या बातम्या