मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: '... तर मी कॅप्टनसी सोडली असती,' KKR च्या मॅनेजमेंटला गंभीरनं खडसावलं

IPL 2021: '... तर मी कॅप्टनसी सोडली असती,' KKR च्या मॅनेजमेंटला गंभीरनं खडसावलं

गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) यशस्वी कॅप्टन आहे. तो 2011 ते 2017 या काळात केकेआरचा कॅप्टन होता. केकेआरच्या एका निर्णयावर गौतम गंभीरनं नाराजी व्यक्त केली आहे.

गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) यशस्वी कॅप्टन आहे. तो 2011 ते 2017 या काळात केकेआरचा कॅप्टन होता. केकेआरच्या एका निर्णयावर गौतम गंभीरनं नाराजी व्यक्त केली आहे.

गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) यशस्वी कॅप्टन आहे. तो 2011 ते 2017 या काळात केकेआरचा कॅप्टन होता. केकेआरच्या एका निर्णयावर गौतम गंभीरनं नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई, 27 सप्टेंबर : गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) यशस्वी कॅप्टन आहे. तो 2011 ते 2017 या काळात केकेआरचा कॅप्टन होता. गंभीरच्या कॅप्टनसीखालीच केकेआरनं दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. केकेआरची या सिझनमधील सुरुवात निराशाजनक झाली होती. पण सेकंड हाफमध्ये त्यांनी तीन पैकी दोन मॅच जिंकल्या असून त्यामुळे त्यांच्या 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याच्या आशा जिवंत आहेत.

केकेआर मॅनेजमेंटच्या एका निर्णयावर गौतम गंभीरनं नाराजी व्यक्त केली आहे. केकेआरचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) हा मॅचच्या दरम्यान टीम एनलिस्टकडून कोड वर्डच्या माध्यमातून संपर्कात असतो. हे या स्पर्धेत उघड झालं आहे. मॅचच्या दरम्यानही टीम मॅनेजमेंट या माध्यमातून कॅप्टनवर नियंत्रण ठेवत आहे, अशी टीका होत आहे. गंभीरनंही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 'माझ्या कॅप्टनसीमध्ये या प्रकारच्या गोष्टी झाल्या असत्या तर मी कॅप्टनसी सोडली असती,' असं मोठं वक्तव्य गंभीरनं केलं आहे. तो 'स्टार स्पोर्ट्स' वरील कार्यक्रमात बोलत होता.

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीची झोप उडवणारा 'हा' बॉलर ठरणार टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड

काय आहे प्रकरण?

मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये  मॉर्गन 'कोड वर्ड'च्या माध्यमातून ड्रेसिंग रुमची मदत घेत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईची रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक ही जोडी मैदानात असताना मॉर्गनला ड्रेसिंग रुममधून केकेआरचे एनलिस्ट नॅथन लीमन (Nathan Leamon) यांनी 'कोड वर्ड'च्या माध्यमातून गुप्त संदेश दिला.

लीमननं एका प्ले कार्डच्या मदतीनं मॉर्गनला हा संदेश दिला. यावर एक आकडा मोठ्या फॉन्टमध्ये लिहिला होता. हा फॉन्ट इतका मोठा होता की तो लांबूनही स्पष्ट दिसत होता. लीमन यांनी या माध्यमातून मॉर्गनला गुप्त संदेश पाठवल्याचं मानलं जात आहे.

IPL 2021, MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या बॉलरनं विकेट मिळताच केलं असं काही...पाहा VIDEO

या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्येही मॉर्गन-लीमन जोडीनं हाच प्रकार केला होता. त्यावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं टीका केली होती. डगआऊटमधून या प्रकारची मदत मिळणार असेल तर कुणीही कॅप्टन होऊ शकतं, असं मत तेव्हा सेहवागनं व्यक्त केले होते.

First published:

Tags: Gautam gambhir, IPL 2021, KKR