सैनीच्या पदार्पणानंतर वाद पेटला, गंभीर आणि 2 माजी क्रिकेटपटू भिडले

क्रिकेटमध्ये घराणेशाही आणणाऱ्यांनी कोण खालच्या पातळीवर घसरलं बघावं असं म्हणत गंभीरने दोन माजी क्रिकेटपटूंवर टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 09:26 AM IST

सैनीच्या पदार्पणानंतर वाद पेटला, गंभीर आणि 2 माजी क्रिकेटपटू भिडले

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्यावर गौतम गंभीरने टीका करताना सैनीला दुय्यम वागणूक दिल्याचं म्हटलं होतं. त्यानतंर बेदी यांनी नवदीप सैनीबद्दल आपल्या मनात काहीच वाईट नाही. मात्र, गंभीरने केलेली टीका योग्य नाही असं म्हटलं. तर माजी खासदार आणि क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी सुद्धा गंभीरवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं होतं की, स्वत:च्या कौतुकासाठी गंभीरने दुसऱ्यांना कमी लेखू नये.

दोन्ही माजी खेळाडूंच्या टीकेनंतर पुन्हा गंभीरने प्रत्युत्तर दिलं आहे. गंभीरने बिशनसिंग बेदींवर आरोप केले आहेत. ते घराणेशाहीत गुंतले होते. त्यांनी मुलगा अंगद बेदीला दिल्लीच्या संघात घेण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही केला. गंभीरने बेदी आणि चौहान यांना उत्तर देताना म्हटलं की, खालच्या पातळीवर घसरल्याचा आरोप करणाऱ्यांनी हेसुद्धा बघावं की मुलाच्या निवडीसाठी कोण प्रयत्न करत होतं. तसेच आपल्या भाच्यासाठी चेतन चौहान कसे अडून बसले होते.

अमेरिकेत सुरू असलेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण कऱणाऱ्या नवदीप सैनीने पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेतल्या. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर 2 दिग्गज माजी क्रिकेटपटूंवर भडकला होता. गंभीरने दिग्गज फिरकीपटू बिशन सिंग बेदी आणि फलंदाजी चेतन चौहान यांना ट्विटरवरूनव सुनावलं होतं.

गंभीरने ट्विटमध्ये लिहलं होतं की, भारताकडून पदार्पण करणाऱ्या सैनीचं अभिनंदन, त्यानं पहिला चेंडू टाकण्याआधीच बिशन बेदी आणि चेतन चौहान यांना बाद केलं होतं. ज्या खेळाडूनं मैदानावर पाऊल टाकण्याआधीच त्याचं क्रिकेट करिअर संपल्याचं म्हटलं होतं त्यानंच आता तुमची झोप उडवली. तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात गंभीरने ट्विट केलं होतं.

Loading...

बिशनसिंग बेदी यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, मला नाही वाटत की गंभीरप्रमाणे इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज आहे. मी ट्विटरवरील त्याच्या टीकेला उत्तर देणार नाही. नवदीप सैनीबद्दल कधीच नकारात्मक बोललो नाही. याशिवाय एखाद्यानं काही मिळवलं असेल तर ती त्याची स्वत:ची प्रतिभा असते. ते कोणामुळं मिळालेलं नसतं असं म्हणत गंभीरवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.

सैनीने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात लागोपाठ दोन गडी बाद केले. त्याने निकोलस पूरन आणि शिम्रॉन हेटमायर यांना बाद करून विंडीजला डबल धक्का दिला. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएल गाजवणाऱ्या सैनीने राष्ट्रीय संघात स्थान मिळण्यासाठी दावा केला होता.

नवदीप सैनीच्या करिअरच्या सुरुवातीला गंभीरने मदत केली आहे. दिल्लीचा नसल्यानं त्याला खेळण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. तेव्हा दिल्ली क्रिकेटशी बोलून गंभीरने प्रयत्न केले होते. नवदीपने दिल्ली जिल्ही क्रिकेट संघाच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. तेव्हा त्याच्या बाजूने गंभीर उभा राहिला होता.

नवदीपने गंभीरचा विश्वास सार्थ ठरवत घरेलू क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याची निवड 2017 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर नेट अभ्यासात खेळाडूंना गोलंदाजीसाठी करण्यासाठी झाली. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी निवड झाली होती.

SPECIAL REPORT: भारतीय जवानांनी पाकचे दात घशात घातले, दहशतवाद्यांसह बॅटच्या 7 कमांडोंचा खात्मा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 5, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...