दोन वर्ल्ड कप विजेत्या गौतम गंभीरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

दोन वर्ल्ड कप विजेत्या गौतम गंभीरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

आयुष्यात जड अंतःकरणाने आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात. आज मी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ०४ डिसेंबर २०१८- गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर असलेल्या भारताच्या सलामीवीर गौतम गंभीरने मंगळवारी क्रिकेटच्या तीनही प्रकारातून निवृत्ती घेतली. गौतमने ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून तो निवृत्त होत असल्याचे म्हटले.

‘आयुष्यात जड अंतःकरणाने आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात. आज मी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मला निवृत्तीची फार भीती होती. पण, आज मी तिच गोष्ट करत आहे. मी निवृत्ती घेत आहे,’ असे गौतमने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना म्हटले.

गंभीरने भारतासाठी ५८ कसोटी सामने, १४७ एकदिवसीय सामने आणि ३७ टी२० सामने खेळला. गंभीरने ५८ कसोटी सामन्यात ३९.६८ च्या सरासरीने ११ शतकी खेळी खेळत ५२३८ धावा केल्या. गंभीरने टी२० सामन्यातही आपली छाप सोडली. त्याने ३७ सामन्यांमध्ये ७ अर्धशतक झळकावत २७.४१ च्या सरासरीने ९३२ धावा केल्या.

गौतमच्या करिअरमध्ये भारताने दोन वर्ल्डकप जिंकले. यात २००७ च्या टी२० वर्ल्डकप आणि २०११ च्या वर्ल्ड कपचा समावेश आहे. या दोन्ही वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात गंभीरने भारतासाठी सर्वोच्च धावा केल्या. आपल्या निवृत्तीबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय आहे. मला अनेक दिवसांपासून वाटतं होतं की निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आली आहे. अखेर आज मी निवृत्त होत आहे. माझ्या करिअरमध्ये मदत करणाऱ्यांचे मी आभार मानतो.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 08:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading