पुन्हा एकदा टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार गॅरी कर्स्टन, या खेळाडूंसोबत असेल स्पर्धा

पुन्हा एकदा टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार गॅरी कर्स्टन, या खेळाडूंसोबत असेल स्पर्धा

एमएस धोनी कर्णधार असताना संघाला जेवढं यश मिळालं त्यात प्रशिक्षक गॅरी कर्स्टनचा फार मोठा हात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०१८- भारताला २०११ मध्ये प्रशिक्षक म्हणून चॅम्पियन बनवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन पुन्हा एकदा टीम इंडियाचे प्रशिक्षक होऊ शकतात. फरक फक्त एवढाच आहे की, यावेळी ते महिला क्रिकेट संघाला प्रशिक्षण देतील. भारतीय महिला क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या वादामुळे आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांचा करार संपल्यामुळे बीसीसीआय येत्या २० डिसेंबरला नवीन प्रशिक्षकांची मुलाखत घेणार आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गॅरी कर्स्टन यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे. गॅरी यांनी या आधी या पदाबद्दलची माहिती विचारली होती. आता त्यांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. बीसीसीआयने या पदाच्या मुलाखतीसाठी एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे.

गॅरी कर्स्टन २००८ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले होते. गॅरी यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून तेव्हा जबाबदारी हातात घेतली जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपलच्या वादातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते.

एमएस धोनी कर्णधार असताना संघाला जेवढं यश मिळालं त्यात प्रशिक्षक गॅरी कर्स्टनचा फार मोठा हात आहे. २०११ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्स्टन यांनी खाजगी कारणामुळे भारताचे प्रशिक्षक पद सोडले होते. आता त्यांनीच पुन्हा अर्ज केल्यामुळे महिला क्रिकेटसाठीच्या प्रशिक्षकांच्या स्पर्धेत ते आपसूक पुढे गेले आहेत.

गॅरी कर्स्टनशिवाय दक्षिण आफ्रिकेच्याच हर्शल गिब्स आणि १९९६ मध्ये श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकवून दिलेले प्रशिक्षक डेव व्हाटमोर यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे. भारतीय प्रशिक्षकांमध्ये मनोज प्रभाकर, अतुल बेडाडे, डेविड जॉनसन आणि राकेश शर्मा यांच्या नावांचा सहभाग आहे. महिला संघाचे वादग्रस्त प्रशिक्षक रमेश पोवार यांनीही पुन्हा एकदा अर्ज भरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला संघाच्या प्रशिक्षकांच्या मानधनातही वाढ करण्यात येणार आहे.

#FITINDIA - लोकमत ग्रुपच्या महामॅरेथॉन स्पर्धेतला जोष पाहिला का?

First published: December 16, 2018, 2:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading