धोनीला सचिन, सेहवाग आणि मी एकाचवेळी संघात नको होतो; गंभीरचा खळबळजनक खुलासा

गंभीरने म्हटलं की, धोनीला 2012 मध्ये सचिन, सेहवाग आणि मला एकाचवेळी प्लेइंग इलेवनमध्ये घ्यायचं नव्हतं. तसेच 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही हे 2012 मध्ये सांगितलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 09:16 AM IST

धोनीला सचिन, सेहवाग आणि मी एकाचवेळी संघात नको होतो; गंभीरचा खळबळजनक खुलासा

भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सध्या होत आहे. दरम्यान धोनी लगेच निवृत्ती घेणार नसल्याचंही म्हटलं जात आहे. धोनी वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच तो पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेईल अशीही चर्चा आहे.

धोनीच्या संथ खेळीवर अनेकांनी टीका केली आहे. आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की, धोनीने 2012 मध्ये ठरवलं होतं की मी, सचिन आणि सेहवाग 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही. त्याशिवाय त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरसुद्धा जाहीर केलं होतं की तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन, गंभीर आणि  सेहवाग यांना एकाचवेळी संधी देणार नाही.

गंभीरने म्हटलं की, धोनीला 2012 मध्ये सचिन, सेहवाग आणि गंभीर यांना एकाचवेळी प्लेइंग इलेवनमध्ये घ्यायचं नव्हतं. यामागं कारण सांगताना धोनीने त्यांचे क्षेत्ररक्षण चांगलं नसल्याचं म्हटलं होतं. गंभीर म्हणाला की धोनीचं हे म्हणणं धक्कादायक होतं. तीन वर्ष आधी तुम्हाला पुढचा वर्ल्ड कप खेळता येणार नाही असं कोणाला सांगितल्याचं मी कधीच ऐकलं नव्हतं.

धोनीच्या पलिकडे पाहण्याची आता गरज आहे. धोनी कर्णधार होता तेव्हा तो भविष्याकडे बघत होता. धोनीने स्वत: नव्या खेळाडूंवर विश्वास ठेवला होता. त्यानं प्रॅक्टिकल निर्णय घेतले हो असंही गंभीरने सांगितलं.

धोनीची जागा कोण घेणार याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याबद्दल बोलताना गंभीरने ऋषभ पंत, संजु सॅमसन, इशान किशन यांचे नाव घेतले. या खेळाडूंना एक दीड वर्ष मिळायला हवं. त्यांची कामगिरी पाहून संधी दिली पाहिजे असं गंभीर म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...