वडिलांचं चहाचं दुकान, आई जनावरं चारते; एक डोळा अधू असतानाही क्रिकेटमध्ये चमकला

वडिलांचं चहाचं दुकान, आई जनावरं चारते; एक डोळा अधू असतानाही क्रिकेटमध्ये चमकला

टीएनपीएलमध्ये डिंडीगुल संघानं त्याला ट्रायलमध्येही घेतलं नव्हतं. त्यांच्याविरुद्ध अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करत संघाला एकहाती विजेतेपद मिळवून दिलं.

  • Share this:

चेन्नई, 08 सप्टेंबर : तामिळनाडु प्रीमियर लीगमध्ये चेपॉक सुपर गिलीजने सलग दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली. यात वेगवान गोलंदाज जी पेरियास्वामीचं नाव चर्चेत आलं आहे. त्याने अंतिम सामन्यात 5 तर स्पर्धेत 21 गडी बाद केले. या स्पर्धेच्या इतिसाहातील ही सर्वोच्च कामगिरी आहे. या कामगिरीच्या जोरावर पेरियास्वामीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र, त्याचा हा प्रवास सहज नव्हता.

वयाच्या 7व्या वर्षी तामिळनाडुच्या या क्रिकेटरला चिकन पॉक्स झाला होता. यामुळं त्याच्या एका डोळ्याला इजा झाली आणि दिसणं कमी झालं. यामुळं शाळेत त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. शाळेत मुलंही त्याला त्रास द्यायची. या त्रासानं 7 वी नंतर शाळा सोडावी लागली होती.

पेरियास्वामी तामिळनाडुच्या सलेम जिल्ह्यातील चिनप्पाम्पट्टीत राहतो. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यात क्रिकेट खेळणं कठीण होतं. त्यावेळी टी नटराजन आणि चिनप्पाम्पट्टी क्रिकेट क्लब चालवणाऱ्या जयप्रकाश यांनी त्याची मदत केली. पेरियास्वामीचे वडील गणेशन चहाचं दुकान चालवतात तर आई पशुपालन करते. पेरियास्वामीनं टेनिस बॉल क्रिकेटपासून खेळण्यास सुरुवात केली होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो जनावरं चरायला घेऊन जाणं यासारकी कामं करायचा. क्रिकेट सोडून त्यानं वेल्डिंगचं कामसुद्धा केलं होतं.

पेरियास्वामाचा मित्र टी नटराजनने त्याला खूप मदत केली. टीएनपीएलच्या आधी पेरियास्वामीने कधीच फ्लड लाइटमध्ये क्रिकेट खेळलं नव्हतं. मात्र, मलिंगासारखी गोलंदाजी टाकत त्यानं फलंदाजांमध्ये धडकी भरवली आहे. या स्पर्धेत पेरियास्वामी नटराजनचे शूज घालून खेळला होता.

यंदा उपविजेतेपद पटकावलेल्या संघानं त्याला ट्रायलमध्ये निवडलं नव्हतं. त्यानंतर पेरियास्वामीनं त्याच डिंडीगुल ड्रॅगन्सविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यानं डिंडीगुलविरुद्ध 27 धावांत 3 गडी बाद केले होते. तर अंतिम सामन्यात 15 धावात 5 गडी बाद केले होते.

वाचा : धोनीच्या निवृत्तीवर कुंबळेचा निवड समितीला सल्ला, पंतच्या खेळाबद्दल म्हणाला...

पेरियास्वामीने त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की, हे सर्व स्वप्नवत होतं. मी कधी टीएनपीएलमध्ये खेळण्याचा आणि विजयाचा विचारही केला नव्हता. मी काम करत असताना घरच्यांकडून खेळण्याची परवानगी घ्यायला लागत होती. टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यानं लेदर बॉलवर गोलंदाजी करताना समस्या येत होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये त्याला संधी मिळू शकते.

ती आली... तिनं जिंकलं, दिग्गज टेनिसस्टारला धक्का देत 19 वर्षीय बियांकानं पटकावलं विजेतेपद

VIDEO: बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 8, 2019 02:42 PM IST

ताज्या बातम्या