VIDEO : पुन्हा एकदा धोनीचा चाहता मैदानात, पाहा माहीने काय केलं?

धोनीचा हा खोडकर व्हिडीओ पाहून आवरणार नाही तुम्हाला हसू.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 02:13 PM IST

VIDEO : पुन्हा एकदा धोनीचा चाहता मैदानात, पाहा माहीने काय केलं?

चेन्नई, 18 मार्च: भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. धोनी जिथं जातो तिथं हजारो चाहते त्याला भेटण्यासाठी आतुर असतात. असाच काहीसा प्रसंग रविवारी चेन्नई सुपरकिंग्जच्या सरावादरम्यान पाहायला मिळाला. धोनी आणि त्याच्या एका चाहत्यामध्ये अशी काहीशी रेस पाहायला मिळाली, की ती पाहून तुम्हालाही तुमचं हसणं आवरता येणार नाही. धोनीबाबत हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही.

रविवारी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर धोनी सराव करत असताना, धोनीचा एक चाहता अचानक मैदानात शिरला. त्या चाहत्याला फक्त धोनीसोबत हस्तांदोलन करायचे होते. अचानक आलेल्या आपल्या चाहत्याला पाहून धोनीही भांबावला आणि त्याने पळायला सुरुवात केली. याचदरम्यान पळताना, धोनीने चेन्नईचा बॉलिंग कोच लक्ष्मीपति बालाजीलाही पकडले. या सगळ्यात मस्तीत धोनीचे एक वेगळेच रुप पाहायला मिळाले. नेहमी मैदानावर शांत आणि संयमी असणारा धोनी या व्हिडीओमध्ये दंगामस्ती करताना दिसला. त्या चाहत्यापासून वाचण्यासाठी धोनी चक्क संपूर्ण मैदानभर धावला. अखेर सुरक्षारक्षकांनी त्या चाहत्याला पकडले. मात्र, धोनीने त्या चाहत्याची इच्छा पूर्ण करत, त्याची भेट घेतली. धोनीचा हा सर्व खोडकरपणा यावेळी कॅमेऱ्यात कैद झाला.


Loading...


येत्या शनिवारी चेन्नई आयपीएलमधील पहिला सामना घरच्या मैदानावर कोहलीच्या बेंगळुरु संघाविरोधात खेळणार आहे. रविवारी सरावासाठी आलेल्या धोनीचे त्याच्या चाहत्यांनी एका वेगळ्याच जयघोषात स्वागत केले.आयपीएलच्या 12व्या हंगामात धोनी आपल्या यलो गॅंग सोबत चौथे आयपीएल टायटल जिंकण्यास सज्ज आहे. चेन्नईही आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ आहे. 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएल जिंकणारा हा संघ, 2008, 2012, 2013 आणि 2015मध्ये उपविजेता संघ होता. तर, 2009 आणि 2014मध्ये चेन्नई सेमीफायनलिस्ट होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात धोनीची सेना कशी आयपीएल गाजवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 02:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...