WTC Final : 45 मिनिट्स है तुम्हारे पास...! शाहरुखच्या 70 मिनिटांसारखा गावसकरांचा टीम इंडियाला मंत्र

WTC Final : 45 मिनिट्स है तुम्हारे पास...! शाहरुखच्या 70 मिनिटांसारखा गावसकरांचा टीम इंडियाला मंत्र

'चक दे! इंडिया' (Chak De! India) सिनेमातील या गाजलेल्या प्रसंगाची आठवण यावी असा मंत्र टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय क्रिकेट टीमला दिला आहे

  • Share this:

मुंबई, 19 जून : 'चक दे! इंडिया' (Chak De! India) या गाजलेल्या हिंदी सिनेमातील कबीर खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या एका भाषणाचा प्रसंग सर्वांना चांगलाच माहिती आहे. भारतीय महिला हॉकी टीम ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक फायनल खेळण्यापूर्वीचा हा प्रसंग आहे. यावेळी टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये शाहरुख खान सर्व खेळाडूंना विजयाचा मंत्र देतो. 'तुमच्या हातामध्ये 70 मिनिटे आहेत. ही 70 मिनिटं तुमच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. याचा पूर्ण वापर करा' असा मंत्र शाहरुख खान टीमला देतो.

गावसकरांचा टीम इंडियाला मंत्र

'चक दे! इंडिया' सिनेमातील या गाजलेल्या प्रसंगाची आठवण यावी असा मंत्र टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय क्रिकेट टीमला दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ऐतिहासिक फायनल (WTC Final 2021) सुरु होण्याच्या काही मिनिटे आधी झालेल्या कार्यक्रमात गावसकर यांनी हा सल्ला दिला आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealnad) यांच्यात होणारा हा सामना पहिल्या दिवशी पावसामुळे होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमधील आव्हानात्मक वातावरणात टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटींग करायची आहे.

टीम इंडियाच्या बॅट्समनसाठी गावसकरांनी हा सल्ला दिला आहे. या मॅचमधील पहिले 45 मिनिटे खूप महत्त्वाची आहेत. या 45 मिनिटामध्ये बॉल खेळून काढा. कोणताही धोका पत्कारु नका. हे 45 मिनिटे खेळून काढली की नंतर बॅटींग करणे सोपे जाईल. असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे. टीम इंडियाच्या संपूर्ण इनिंगची दिशा हे 45 मिनिटे निश्चित करतील असे गावसकर यांनी सुचवले आहे.

2019 मध्ये झाला होता घात

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2019 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही पावसाचा अडथळा आला होता. पावसामुळे ती वन-डे मॅच दोन दिवस झाली. त्या मॅचमध्येही टीम इंडियाचा पहिल्या 45 मिनिटांमध्येच घात झाला होता. न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्ससमोर पहिल्या 45 मिनिटांमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली आणि वर्ल्ड कप विजेतेपदाचं आपलं स्वप्न भंग झालं. गावसकर यांनी 45 मिनिटे सावध खेळा हा जो मंत्र टीम इंडियाला दिला आहे. त्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

केन विलियमसनने टॉस जिंकला, पहिले बॉलिंगचा निर्णय

भारतीय टीम

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंडची टीम

टॉम लेथम, डेवॉन कॉनवे, केन विलियमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डे ग्रॅण्डहोम, काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट

Published by: News18 Desk
First published: June 19, 2021, 3:14 PM IST

ताज्या बातम्या