मुंबई, 20 ऑक्टोबर: न्यूझीलंडचे क्रिकेट अंपायर फ्रेड गुडाल (Fred Goodal) यांचं निधन झालं आहे. गुडाल 83 वर्षांचे होते. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज (New Zealand vs West Indies) यांच्यात 1980 साली झालेल्या वादग्रस्त सीरिजमध्ये ते अंपायर होते. न्यूझीलंड क्रिकेटनं गुडाल यांच्या निधनाची घोषणा केली आहे. पण,त्याचं कारण सांगितलेलं नाही. गुडाल यांनी 1965 ते 1988 या दरम्यान 24 टेस्ट आणि 15 आंतरराष्ट्रीय वन-डे मॅचमध्ये अंपायरिग केली होती. 1980 साली क्राईस्टचर्चमध्ये झालेल्या वादग्रस्त टेस्टमधील अंपायरिंगसाठी ते ओळखले जात होते.
काय घडले होते प्रकरण?
वेस्ट इंडिजचा कॅप्टन क्लाईव्ह लॉयड यांच्या कॅप्टनसीमधील त्या टीममध्ये अनेक सुपरस्टारचा समावेश होता. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर ती टीम न्यूझीलंडमध्ये आली होती. न्यूझीलंडनं त्या सीरिजमधील वन-डे आणि पहिली टेस्ट एक विकेटनं जिंकली होती. या सीरिजम्ये गुडाल यांनी अनेक निर्णय वेस्ट इंडिजच्या विरुद्ध दिले, असा वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा आक्षेप होता.
पहिल्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये जॉन पार्करविरुद्धचं अपिल फेटाळल्यानं मायकल होल्डिंगनं लाथ मारुन स्टंप पाडला होता. दुसऱ्या टेस्टमध्येही अंपायरनी अनेक निर्णय वेस्ट इंडिजच्या विरोधात दिल्यानं वेस्ट इंडिजची नाराजी आणखी वाढली होता. तिसऱ्या दिवशी टी ब्रेक नंतर पाहुण्या टीमनं ड्रेसिंग रुमच्या बाहेर येण्यास नकार दिला होता. गुडाल यांना हटवल्यानंतर आपण मैदानात उतरू अशी वेस्ट इंडिजची भूमिका होती.
It is with great sadness that we acknowledge the passing of New Zealand umpire Fred Goodall (ONZM). Fred stood in 24 Tests (the first of which was in 1965 when he was 27) and 15 ODIs. Fred was 83. Our thoughts at this time are with his wife Diana, and his family. pic.twitter.com/oelPjMBJq7
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 19, 2021
न्यूझीलंडचा कॅप्टन ज्योफ होवार्थनं मध्यस्थी केल्यानंतर वेस्ट इंडिज टीम मैदानात उतरली. मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्यांनी सामान बांधून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिज बोर्डानं हस्तक्षेप केल्यानं खेळाडूंनी न्यूझीलंड सोडले नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या रिकी पॉन्टिंगच्या सहकाऱ्याला अटक, वाचा काय आहे आरोप
चौथ्या दिवसाच्या खेळात वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर कॉलीन क्रॉफ्टनं टाकलेला बॉल गुडाल यांनी नो बॉल घोषित केला. तसंच त्याच्या बॉलिंगवर केलेलं अपिल देखील फेटाळलं. त्यानंतर पुढचा बॉल टाकण्यासाठी आलेल्या क्राफ्टनं बॉल टाकण्यापूर्वी गुडाल यांना जोरदार धडक दिली.
Oh bless #RIP Fred Goodall https://t.co/v9vMZLLmNr pic.twitter.com/7iGfmpLGsm
— Paul is 5G (@five15design) October 19, 2021
गुडाल यांनी 2006 साली दिलेल्या मुलाखतीमध्ये तो सर्व प्रकार वेदनादायी असल्याचं सांगितलं होतं. वेस्ट इंडिज कॅप्टननं या प्रकरणात हस्तक्षेप न केल्यानं आपण निराश झाल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्हाला क्रिकेटबद्दल काहीही माहिती नाही, असं क्राफ्टनं म्हंटल्याचं गुडाल यांचा दावा होता. क्राफ्टने मात्र आपण जाणीवपूर्वक धडक दिल्याचा आरोप फेटाळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand