मुंबई, 26 जानेवारी : टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीवर (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेटमधील शास्त्री -कोहली युगाची समाप्ती झाली. शास्त्रींनी पदभार सोडल्यानंतर आता विराट कोहली देखील तीन्ही प्रकारातील कॅप्टन नाही. कोहली नेहमीच आक्रमक स्वभावाबद्दल ओळखला जातो. कॅप्टनसी सोडल्यानंतर झालेल्या वन-डे सीरिजमध्ये (India vs South Africa) नेहमीसारखा विराट मैदानात दिसला नाही. विराटच्या या नव्या बॉडी लँग्वेज शास्त्रींनी मोठं वक्तव्य केलं आहे.
कॅप्टनसी सोडल्यानंतर विराटचे शारीरिक हाव-भाव बदलले का? असा प्रश्न शास्त्री यांना विचारलण्यात आला होता. त्यावर शास्त्री यांनी सांगितले की, 'मी या सीरिजमधील एकही बॉल पाहिला नाही. विराटमध्ये खूप बदल होईल असे मला वाटत नाही. मी 7 वर्षांनंतर क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. मी सार्वजनिक ठिकाणी परस्परांमधील मतभेदांवर चर्चा करत नाही. माझा कार्यकाळ संपला त्याच दिवशी मी सार्वजनिक ठिकाणी आपल्या खेळाडूंबद्दल बोलणार नाही, हे स्पष्ट केले होते.'
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कार्यकाळात भारतीय टीमनं 40 टेस्ट जिंकल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-2 या फरकानं पराभूत झाल्यानंतर विराटनं या प्रकारातील कॅप्टनसी सोडली. विराटला कॅप्टनसीच्या काळात एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे त्याच्यावर नेहमीच टीका होते. रवी शास्त्रींनी या विषयावर विराटचा बचाव केला आहे.
ख्रिस गेलनं दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाला....
'मोठ्या खेळाडूंनाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकू शकले नाहीत. याचा अर्थ ते खराब खेळाडू आहेत, असा नाही. सचिनलाही (Sachin Tendulakar) पहिला वर्ल्ड कप जिंकायच्या आधी 6 वर्ल्ड कप खेळावे लागले,' असं शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.