मुंबई, 28 ऑक्टोबर: टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे कोच गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) यांच्यावर सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (Pakistan Cricket Board) नजर आहे. पीसीबीची (PCB) मिसाबह-उल-हकच्या (Misbah-ul-Haq) जागी कर्स्टनला स्थायी कोच करण्याची इच्छा आहे. टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान टीमचा हेड कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूस (Waqar Younis) यांनी राजीनामा दिला होता.
दक्षिण आफ्रिकाचा माजी ओपनर असलेल्या गॅरी कस्टर्न यांच्या कोच म्हणून कार्यकाळात टीम इंडियानं 2011 साली क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. कर्स्टन यांच्याबरोबरच या पदासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी बॅटर सायमन कॅटीच आणि पीटर मूर्स देखील स्पर्धेत आहेत. कॅटीच पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा सहाय्यक कोच होताय तसंच या आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) पहिल्या टप्प्यापर्यंत तो विराट कोहलीच्या आरसीबी (RCB) टीमचा हेड कोच होता.
पीटर मूर्स इंग्लंडचे दोनदा हेड कोच होते. तसंच त्यांनी इंग्लंडमधील नॉटिंघमशायर या क्लबचे कोच म्हणून तीन वर्ष काम केले आहे. दोन वेगवेगळ्या काऊंटी टीमसोबत चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या मोजक्या कोचमध्ये मूर्स यांचा समावेश होतो. पीसीबीनं सध्या माजी ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताकला हंगामी कोच म्हणून नियुक्त केलं आहे. त्याचबरोबर माजी ऑल राऊंडर अब्दुल रज्जाकची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केलीय. 'इंडियन एक्स्प्रेस' मधील वृत्तानुसार पाकिस्तान टीमला पूर्णवेळ विदेशी कोच असावा असं पीसीबी अध्यक्ष रमिझ राजा यांचं मत आहे.
पाकिस्तान जिंकल्यानंतर स्टेटस ठेवलं 'We Won', नोकरी जाताच शिक्षिका म्हणाली...
पीसीबीला आवडीच्या व्यक्तीला कोच करण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. कारण सध्या अनेक जण फ्रँचायझी क्रिकेटचे कोच होण्यास उत्सुक असतात. कमी कालावधीमध्ये होणारी जास्त कमाई हे याचं मुख्य कारण आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमची या टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी सुरू आहे. त्यांनी वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाचा पराभव केला. टीम इंडियाला 10 विकेट्सनं पराभव केल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडचाही 5 विकेट्सनं पराभव केला. या दोन विजयानंतर त्यांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग सोपा झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.