मुंबई, 26 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल
(WTC Final) गमावल्यानंतर टीम इंडिया मोठी सुट्टी घेणार आहे. आता भारतीय टीमची पुढील सीरिज 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. टीम इंडियानं कमी तयारीमुळे न्यूझीलंड विरुद्धची फायनल गमावली होती. त्यानंतरही आगामी मालिकेपूर्वी ही सुट्टी देण्यात आल्यानं माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर
(Dilip Vengsarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वेंगसरकर यांनी सांगितले की, “मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दरम्यान क्रिकेटचा आनंद घेतला. भारतीय क्रिकेट टीमनं संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केला. पण कमी तयारीमुळे त्यांना फायनलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. इतक्या महत्त्वाच्या मॅचपूर्वी त्यांनी एकही सराव सामना खेळला नाही. दुसरिकडे न्यूझीलंडची टीम मॅच फिट होती. त्यांनी फायनलपूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट खेळल्या होत्या.”
बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेटपटू या ब्रेकमध्ये ब्रिटनमधील वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. बहुतेक खेळाडूंना लंडन आणि आसपासचा परिसर माहिती असल्यानं ते लंडनमध्येच राहण्याची शक्यता आहे. वेंगसरकर या सुट्टीवर म्हणाले की, “हे वेळापत्रक कुणी तयार केलं मला माहिती नाही. तुम्हाला मालिकेपूर्वी सुट्टी मिळते त्यानंतर पुन्हा परत येऊन टेस्ट सीरिज खेळायची आहे. WTC फायनलनंतर एक आठवड्यांची सुट्टी ठीक होती. तुम्हाला सातत्याने खेळण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला मान्यता कुणी दिली? हा मला प्रश्न पडला आहे."
'मला 12 वर्ष नीट झोप लागली नाही', सचिननं सांगितलं धक्कादायक सत्य
कोहलीवर टीका
वेंगसरकर यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर
(Virat Kohli) देखील टीका केली आहे. “कोहलीनं बॅट्समनना इंटेंट दाखवण्याचा सल्ला दिला आहे. तसं असेल तर टीम या मॅचसाठी तयार का नव्हती? त्यांनी चार दिवसांचे किमान दोन सामने खेळणे आवश्यक होते.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.