• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'हार्दिकवर अवलंबून राहू नका, 'या' मुंबईकरला तयार करा,' टीम इंडियाला सल्ला

'हार्दिकवर अवलंबून राहू नका, 'या' मुंबईकरला तयार करा,' टीम इंडियाला सल्ला

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टेस्टमध्ये बॉलिंग करण्यासाठी फिट नाही. त्यामुळे टीम इंडियानं आता त्याच्यावर अवलंबून न राहता नवा पर्याय शोधला पाहिजे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून: टीम इंडियाचा मुख्य ऑल राऊंडर म्हणून काही वर्षींपूर्वी हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) उदय झाला होता. आक्रमक बॅट्समन आणि फास्ट बॉलर असलेल्या हार्दिकमुळे टीममध्ये संतुलन निर्माण झाले. हार्दिकमुळे टीम इंडियाला एक अतिरिक्त बॅट्समन किंवा बॉलर खेळण्याची सोय होती. गेल्या दोन वर्षांमध्ये हे चित्र बदललं आहे. हार्दिकला या काळात पाठदुखीचा त्रास सहन करावा लागला आहे. या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या काही काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर तो बॅट्समन म्हणून परतला. टीम इंडिया (Team India) किंवा त्याची आयपीएल टीम असलेल्या मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indian) हार्दिक फक्त बॅट्समन म्हणून खेळला आहे. दुखापतीनंतर त्याने अत्यंत कमी वेळा बॉलिंग केली आहे. याच कारणामुळे हार्दिकनं टेस्ट टीममधील जागा देखील गमावली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिजसाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये हार्दिकचा समावेश नाही. हार्दिक पांड्या टेस्टमध्ये बॉलिंग करण्यासाठी फिट नाही. त्यामुळे टीम इंडियानं आता त्याच्यावर अवलंबून न राहता नवा पर्याय शोधला पाहिजे, असं मत निवड समितीचे माजी सदस्य सरणदीप सिंग (Sarandeep Singh) यांनी व्यक्त केलं आहे.  'तुम्ही आता हार्दिकवर आणखी अवलंबून राहू शकत नाही. तो कधी फिट होईल आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये बॉलिंग करेल, हे माहिती नाही. त्यामुळे त्याला पर्याय शोधला पाहिजे. त्याचा पर्याय म्हणून शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) तयार करा," असा सल्ला शरणदीप यांनी टीम इंडियाला दिला आहे. ते पीटीआयशी बोलत होते. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या शार्दुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात  प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं ब्रिस्बेन टेस्टमध्ये संधी मिळाली होती. त्या टेस्टमध्ये शार्दूलनं अर्धशतक झळकावले होते. तसंच उपयुक्त बॉलिंग केली होती. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा तो सदस्य आहे. पण न्यूझीलंड विरुद्धच्या फायनल टेस्टसाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. WTC Final: विराटचा जडेजाबद्दलचा निर्णय चुकला, सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य सिराजला संधी हवी इंग्लंड विरुद्धच्या सर्व पाच टेस्टमध्ये मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) खेळवण्यात यावे मत सरणदीप यांनी व्यक्त केलं आहे. "या सीरिजमध्ये फास्ट बॉलर्सना रोटेशनमध्ये खेळवण्यात यावं आणि सिराजला पूर्ण संधी देण्यात यावी.  टीम मॅनेजमेंटनं त्यांचं धोरण लवचिक ठेवण्याची गरज आहे.  दोन स्पिनर्स खेळवणं ठीक आहे, पण परिस्थिती फास्ट बॉलर्सना मदत करणारी असेल, तर एक अतिरिक्त फास्ट बॉलर खेळवला पाहिजे." असं त्यांनी यावेळी सांगितले.
  Published by:News18 Desk
  First published: