राजकोट, 16 मे : सध्या संपूर्ण देश कोरोना महामारीचा (corona pandemic) सामना करत आहे. या महामारीमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय. त्यांच्या जाण्यानं कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. क्रिकेट विश्वातूनही एक धक्कादायक बातमी येत आहे. माजी भारतीय ऑलराऊंडर राजेंद्रसिंह जडेजा (Rajendrasinh Jadeja) यांचं करोनानं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. ते 66 वर्षांचे होते. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं (SCA) त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
राजेंद्रसिंह जडेजा हे उत्तम ऑल राऊंडर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी 50 फर्स्ट क्लास आणि 11 लिस्ट A मॅचमध्ये अनुक्रमे 134 आणि 14 विकेट्स घेतल्या. या दोन्ही प्रकारात त्यांनी अनुक्रमे 1536 आणि 104 रन देखील काढले आहेत. त्याचबरोबर जडेजा यांनी 53 फर्स्ट क्लास, 18 लिस्ट A आणि 34 टी20 मॅचमध्ये रेफ्री म्हणून देखील काम केलं आहे. ते सौराष्ट्र क्रिकेट टीमचे कोच, मॅनेजर आणि निवड समितीचे सदस्य देखील होते.
बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांनी जडेजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ' राजेंद्रसिंह जडेजा हे दर्जा, शैली आणि नैतिकतेच्या आधारावर एक चांगले क्रिकेटपटू आणि व्यक्ती होते. क्रिकेटबद्दलचं त्यांचं समर्पण आणि योगदान कधीही विसरता येणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
आई - वडिलांचा सुरू आहे कोरोनाशी संघर्ष, युजवेंद्र चहलचं सर्वांना भावुक आवाहन
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनीही जडेजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'त्यांचं निधन हे क्रिकेट विश्वाची मोठी हानी आहे. मी आजवर ज्या व्यक्तींना भेटलोय त्यापैकी ते एक जबरदस्त व्यक्ती होते. ते कोच, मॅनेजर आणि निवड समितीचे सदस्य असताना क्रिकेट खेळण्याचं भाग्य मला लाभलं,' असं जयदेव शहा यांनी म्हंटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket