मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /करारा जवाब मिलेगा! शोएब अख्तरनं दिली PTV ला धमकी, लष्कराचीही दाखवली भीती

करारा जवाब मिलेगा! शोएब अख्तरनं दिली PTV ला धमकी, लष्कराचीही दाखवली भीती

पाकिस्तान क्रिकेट टीमच्या दमदार कामगिरीनंतरही पाकिस्तानमधले वाद संपत नाहीत. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमच्या दमदार कामगिरीनंतरही पाकिस्तानमधले वाद संपत नाहीत. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमच्या दमदार कामगिरीनंतरही पाकिस्तानमधले वाद संपत नाहीत. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर: पाकिस्तानची क्रिकेट टीम (Pakistan Cricket Team) टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) चांगली कामगिरी करत आहे. त्यांनी सर्व मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला असून आता त्यांची लढत ऑस्ट्रेलियाशी (Pakistan vs Australia) होणार आहे. क्रिकेट टीमच्या दमदार कामगिरीनंतरही पाकिस्तानमधले वाद संपत नाहीत. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशननं (PTV) अख्तरला 10 कोटींची नोटीस दिली आहे. मागच्या महिन्यात एका कार्यक्रमात झालेल्या वादानंतर अख्तरनं लाईव्ह कार्यक्रमात राजीनामा  (Shoaib Akhtar On Air Resignation) दिला होता. शोएबनं हा राजीनामा देत कराराचा भंग केल्याचा दावा पीटीव्हीनं केला आहे. पीटीव्हीच्या नोटीसीनंतर शोएब आक्रमक झाला असून त्यानं चॅनलवर चोरीचा आरोप करत धमकी दिली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात माझ्यासोबत पाकिस्तान पंतप्रधान आणि पाकिस्तानचं लष्कर देखील आहे, असं अख्तरनं जाहीर केलं असून पीटव्हीला चोख उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

अख्तरनं एका पाकिस्तानच्या न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं की, 'देशातील सर्व राजकीय पक्ष माझ्यासोबत आहेत. सेना माझ्या बरोबर आहे. सरकार माझ्या बरोबर आहे. नॅशनल हिरोला देण्यात आलेली वागणूक पाहून संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. कॅबिनेटमध्ये याबाबतचा प्रस्ताव पास झाला आहे. पंतप्रधानांनी या विषयावर मला पाठिंबा दिला आहे. मी तुम्हाला काही उत्तर दिलं नाही, याचा अर्थ मी तुम्ही काहीही बोलावं असं नाही. माझ्या वकिलांनी सर्व गोष्टींची नोंद केली आहे. आम्ही पीटीव्हीला चोख उत्तर देणार आहोत.' असं अख्तरनं सांगितलं.

रवी शास्त्रींनी टीमचा निरोप घेतल्यानंतर विराट झाला इमोशनल, वाचा पहिली प्रतिक्रिया

|PTV वर चोरीचा आरोप

शोएब अख्तरनं यावेळी पीटीव्हीवर चोरीचा आरोपही केला. 'पीटीव्ही चोरी करतो आणि नंतर त्यांच्याकडून नॅशनल ऑयकॉनला नोटीस पाठवली जाते. तुमच्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तुम्ही नुकसान भरपाईची नोटीस कशी पाठवता? खूप साऱ्या गोष्टी आहेत. माझ्याकडून उत्तर जाईल तेव्हा त्यांना ते समजेल.' असंही अख्तरनं यावेळी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानचे न्यूज चॅनल पीटीव्ही (PTV) वरील 'गेम ऑन है' या कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडला. या  कार्यक्रमात टी20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्या मॅचवर चर्चा सुरू होती. त्यावेळी शोएब अख्तरनं  दिलेलं उत्तर  या शो चा होस्ट नौमान नियाजनं अख्तरला आवडलं नाही. त्यामुळे त्यानं अख्तरला कार्यक्रमातून निघून जाण्याचा आदेश दिला.

IPL 2022: संजू सॅमसननं तोडलं राजस्थानशी नातं! 'या' टीममधील जागा पक्की?

नौमानच्या या आदेशानंतर अख्तरनं कार्यक्रम सुरू असतानाच पीटीव्हीशी असलेला करार तोडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पीटीव्हीनं अख्तरला नोटीस बजावत 10 कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि  3333000 रुपये देण्याची मागणी केली आहे. हे अख्तरचे तीन महिन्यांचे मानधन आहे. अख्तरनं ही भरपाई दिली नाही तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पीटीव्हीनं दिला आहे.

First published:

Tags: Cricket news, Pakistan, Shoaib akhtar